शेतात पाणी भरण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा विहिरीत पाय घसरून पडल्याने मृत्यू

Spread the love

एरंडोल:- शेतात पाणी भरण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा विहिरीत पडल्याने बुडून मृत्यू झाल्याची घटना पळासदड शिवारातील शेतात काल मध्यरात्रीच्या सुमारास घडली.
याबाबत माहिती अशी की अमळनेर दरवाजा परिसरातील मराठे गल्लीत राहणारे देविदास रामदास जोशी वय 62 वर्ष ( स्वस्त धान्य दुकानदार) हे शुक्रवारी दिनांक 27 जानेवारी रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास शेतात पिकांना पाणी भरण्यासाठी गेले होते. दुसऱ्या दिवशी शनिवारी दुपार पर्यंत देविदास जोशी हे घरी न आल्यामुळे त्यांचा मुलगा हर्षल देविदास जोशी हा मित्रांसह वडिलांना पाहण्यासाठी शेतात गेला.

देविदास जोशी यांची मोटरसायकल होती मात्र ते दिसून न आल्यामुळे त्यांनी आजूबाजूच्या शेतकऱ्यांकडे चौकशी केली. दुपारी २ वाजेच्या सुमारास हर्षल जोशी यास विहिरीच्या पाण्यावर बॅटरी तरंगताना दिसली तसेच विहिरीजवळ चिखल असल्यामुळे तसेच पाय घसरल्याची खून दिसून आली हर्षल जोशी याने आजूबाजूच्या शेतकऱ्यांना बोलावले व विहिरीत लोखंडी बिलई टाकले असता देविदास जोशी यांचा हात त्यामध्ये अडकला शेतकऱ्यांनी देविदास जोशी यांना बाहेर काढून ग्रामीण रुग्णालयात नेले असता

वैद्यकीय अधिकारी डॉ. कैलास पाटील डॉ.मुकेश चौधरी डॉ. रोहित पुराणिक. यांनी तपासून त्यांच्या मृत्यू झाल्याचे सांगितले मयत देविदास जोशी यांचे पश्चात पत्नी, दोन मुली, जावई, व मुलगा असा परिवार आहे. देविदास जोशी बंडू महाराज या टोपण नावाने ओळखले जात होते. हर्षल जोशी यांनी दिलेल्या माहितीवरून पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून विकास देशमुख पुढील तपास करीत आहे

हे पण वाचा

टीम झुंजार