विशेष प्रतिनिधी / अमळनेर
चोपडा येथील ३२ वर्षीय तक्रारदारकडे स्वतःचे ट्रॅक्टर असल्याने ते वाळू वाहतुकीचा व्यवसाय करतात , त्यांना अडावद पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाळू व्यवसाय करायचा असल्यास पांच हजार रुपये द्यावे लागतील म्हणून अडावद पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार योगेश संतोष गोसावी वय ३५ राहणार पोलीस वसाहत ,अडावद ता चोपडा यांनी मागणी वाळू व्यवसायिकाकडे केली , तळजोडीअंती पंचासमक्ष ४ हजार रुपयांची लाच अडावद पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार यांच्या सांगण्यावरून होमगार्ड चंद्रकांत काशिनाथ कोळी वय ३६ राहणार कोळीवाडा अडावद ता चोपडा यांनी पोलीस अंमलदार योगेश गोसावी यांच्या व पंचासमक्ष अडावद पोलीस ठाण्याच्या आवारात स्वीकारतांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे ,
त्यांच्या विरुद्ध अडावद पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याने गुन्हा दाखल होतोय , लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील एकाच आठवड्यात ही तिसरी कारवाई असून लाचखोरांचे धाबे दणाणले आहे ,
यांच्या पथकातील टीम ने केली यशस्वी कारवाई
हा सापळा जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक शशिकांत पाटील यांच्या नेतृत्वात पोलीस नाईक ईश्वर धनगर,
पोलीस कॉन्स्टेबल राकेश दुसाने यांच्या पथकाने केली ,त्यांना मदत म्हणून सहाय्यक फौजदार दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील,हवालदार सुनील पाटील, हवालदार रवींद्र घुगे, शैला धनगर, जनार्धन चौधरी, किशोर महाजन, बाळु मराठे, सुनील वानखेडे, महेश सोमवंशी, राकेश दुसाने, प्रणेश ठाकुर सहकार्य करत यशस्वी केला.त्यांना नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे ,अप्पर पोलीस अधीक्षक एन एस न्याहळदे ,पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार यांचे मार्गदर्शन लाभले
हे पण वाचा
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर
- शहापूर चोरीच्या घटनेतील आरोपी जामनेर पोलिसांनी शोधला ; – जामनेर पोलीसांची यशस्वी कामगिरी
- पाच मुलांच्या आईचे सूत जुळले 20 वर्षे लहान तरुणासोबत,दोघे राहिले लिव्ह-इन-रिलेशनमध्ये,तिला आठवणी आली पतीची, अन् भररस्त्यात…..
- अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या धरणगाव तालुकाध्यक्षपदी विनायक महाजन यांची नियुक्ती






