VIDEO : काकूंनी साडीमध्ये उंच पुलावरून पाण्यात झेप घेतली, व्हिडीओ पाहून तुम्हीसुद्धा थक्क व्हाल

Spread the love


सोशल मीडियावर रोज नवीन नवीन व्हिडीओज वायरल होत असतात. अनेक प्रकारचे व्हिडीओज लोकांचे मनोरंजन करत असतात. त्यात खासकरून कॉमेडी आणि अजब कलाकारी असलेले व्हिडीओज असतात. आजचा व्हिडीओसुद्धा एक अजब कलाकृती असलेला आहे. जे पाहून तुम्हीदेखील थक्क होतील. कारण एका वृद्ध महिलेले जेज केलं आहे त्याची तुम्ही कल्पनासुद्धा केलेली नसेल. म्हातारपणी माणसाचे मन लहान मुलासारखे होते असे म्हणतात. मुलं ज्या प्रकारे फक्त मजा करण्याच्या मूडमध्ये असतात, त्याचप्रमाणे म्हातारपणी वृध्द माणसं सुद्धा मस्तीखोर बनतात. एका वृद्ध महिलेचा असा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहून म्हातारपणात माणसं अशक्त होत असल्याची चर्चा खोटी वाटेल. या व्हिडिओमध्ये एक वृद्ध महिला एका उंच पुलावरून उडी मारताना दिसली आहे. त्यानंतर ती अतिशय आरामात पोहत किनाऱ्यावर सुद्धा आली.

काही जणांसाठी पोहणे हा एक व्यायाम असतो आणि पाणी पाहिल्यानंतर त्यांच्या अंगात एक विचित्र चपळता येते. अशी चपळता एका जवळपास ६० वर्षीय महिलेमध्ये दिसून आली. या आजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप शेअर केला जात आहे. ही महिला एका उंच पुलावरून खाली पाण्यात उडी मारत असताना चा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

एवढ्या उंचीवरून महिलेला त्या तलावात उडी मारताना पाहून लोकांना आश्चर्य वाटले. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, त्या तलावात पाणी भरलेले आहे आणि इतर काही लोक सुद्धा त्या पाण्यात आधीपासूनच पोहत आहेत. पण आजीच्या चेहऱ्यावर फक्त उत्साह दिसत होता. तिने निर्भयपणे पुलावरून उडी मारली आणि खाली पाण्यात पडली. यानंतर महिला पोहत सहज किनाऱ्यावर पोहोचली. आजूबाजूला उभ्या असलेल्या लोकांनीही वृद्ध महिलेच्या या धाडसाचे कौतुक केले.

पहा सोशल मीडियावर व्हायरल :

एका वृद्ध महिलेचा हा स्टंट व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये महिलेला झेप घेताना पाहून लोकांचे मन हेलावले. पण त्या महिलेच्या चेहऱ्यावर भीतीचा लवलेश सुद्धा दिसला नाही. ती खूप उत्तेजित झाली आणि तिने नदीत उडी मारली. मग पोहत पोहत ती नंतर किनार्‍यावर पोहोचली. आणि या वृध्द महिलेचा जा व्हिडिओ इंस्टाग्राम या सोशल मीडिया साइटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओने लोकांचे लक्ष वेधून घेतले आणि त्यानंतर एकामागून एक अनेक लोकांनी व्हिडिओमध्ये दिसणार्‍या महिलेच्या धाडसाचे कौतुक करण्यास सुरुवात केली. एवढी चपळता आणि ताजेपणा पाहून लोकांनी या वयातही त्या महिलेचे खूप कौतुक केले. हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार