झुंजार प्रतिनिधी – संतोष कदम.
बारामती :- दि.28/12023 रोजी रात्री 8.30 वाजातच्या सुमारास बारामती तालुका पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक श्री प्रभाकर मोरे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की पांढऱ्या रंगाची स्विफ्ट कार मधून इंदापूर – बारामती मार्गे सासवडला गांजा विक्री साठी जाणार आहे अशी माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक श्री प्रभाकर मोरे यांनी तात्काळ वरिष्ठांना सदर बाबत माहिती देऊन आपले अधीन असणारे सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना या बाबत सूचना देऊन रुई पाटी जवळ रुई गाव येथे रोडवर नाकाबंदी लावली. सदर वेळी उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे हे देखील उपस्थित होते
रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास पांढऱ्या रंगाची स्विफ्ट कार क्र.MH 12 JS 0090 ही रुई गावातून रुई पाटीकडे येत असताना पोलिसांनी तिला थांबून चेक केले असता तिच्या डीकी मध्ये सुमारे जवळपास 10 लाख रुपये किमतीचा सुमारे 50 किलो गांजा मिळून आलेला आहे. सदरचा गांजा विक्रीसाठी घेऊन जाणारे आरोपी नामें. सचिन दिलीप रणवरे वय 35 वर्षे रा हिवरकर मळा सासवड ता पुरंदर जि पुणे व 2) सुनिता प्रताप चव्हाण वय 35 वर्षे रा सणसवाडी ता शिरुर जि पुणे मुळ रा माहुरगड ता पुसद जि नांदेड यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 10 लाख किमतीचा गांजा तसेच 5 लाख रुपये किमतीचा स्विफ्ट कार असा एकूण 15 लाख रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे, त्यांनी सदरची कार्यवाही करून घेतली.

सदरची कामगिरी मा. श्री अंकित गोयल सो पोलीस अधिक्षक पुणे ग्रामिण, मा.श्री आनंद भोईटे सो अपर पोलीस अधिक्षक बारामती, मा. श्री गणेश इंगळे उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती उपविभाग बारामती यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे, सपोनि योगेश लंगुटे, राहुल घुगे सहाय्यक फौजदार साळवे, पो. हवा. राम कानगुडे, सुरेश दडस,अतुल पाटसकर , राजेंद्र जाधव महिला पोलीस हवालदार खंडागळे, आशा शिरतोडे. पोलीस नाईक अमोल नरुटे बापू बनकर, पोलीस कॉन्स्टेबल संतोष मखरे , दीपक दराडे ,दत्ता मदने शशिकांत दळवी तुषार लोंढे यांनी केली आहे.
पुढील अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे हे करीत आहेत.
हे पण वाचा
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर






