अडावद पोलीस ठाण्यातील दोन्ही लाचखोरांना दोन दिवस पोलीस कोठडी

Spread the love

विशेष प्रतिनिधी | अमळनेर

अडावद तालुका चोपडा येथील पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस अंमलदार व होमगार्ड यास काल दिनांक २८ रोजी दुपारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून चार अटक केली होती , त्यांच्यावर अडावद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता , त्यांना आज दिनांक २९ रोजी अमळनेर येथील जिल्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन्ही लाचखोरांची दोन दिवस पोलीस कोठडीत रवानगी केली आहे ,

अडावद पोलीस ठाण्यात नेमणूकीला असलेले पोलीस अंमलदार योगेश संतोष गोसावी राहणार पोलीस वसाहत अडावद याने वाळू वाहतूक करू देण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच चोपडा येथील वाळू व्यावसायिकाकडे केली होती , त्यात तळजोडीअंती चार हजार रुपये ठरले , याबाबतीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केल्यानुसार पोलीस उपअधीक्षक शशिकांत पाटील यांच्या टीमने सापळा रचून पोलीस ठाण्याच्या आवारातच चार हजार रुपयांची लाच पोलिसाचा पंटर होमगार्ड चंद्रकांत काशिनाथ कोळी राहणार कोळीवाडा अडावद यास पोलीस अंमलदार समक्ष रंगेहाथ पकडले ,

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या फिर्यादीवरून दोन्ही लाचखोरांवर नेमणूक असलेल्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता , त्यांना अमळनेर जिल्हा न्यायालयात हजर केले असता ,सरकारी पक्षा तर्फे पोलीस उपअधीक्ष शशिकांत पाटील व सरकारी वकील किशोर बागुल यांनी पोलीस कोठडीची मागणी केली होती , त्यानुसार कन्यायमूर्ती पी आर चौधरी यांनी पोलीस व होमगार्ड या दोन्ही लाचखोरांची दोन दिवस पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार