शिक्षक मतदार संघासाठी सोयगाव तालुक्यात ९०.७३ टक्के मतदान

Spread the love



सोयगाव, दि.३०.(साईदास पवार).शिक्षक मतदार संघासाठी सोयगाव तालुक्यात २५९ पैकी २३५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला शिक्षक मतदार संघासाठी सोयगाव तालुक्यात तीन मतदान केंद्रांवर एकूण ९९.७३ टक्के मतदान झाल्याची माहिती तहसीलदार रमेश जसवंत यांनी दिली

सोयगाव बनोटी आणि सावळादबारा या तीन मतदान केंद्रावर शिक्षक मतदार संघाची मतदान प्रक्रिया सोमवारी पार पडली यामध्ये सर्वाधिक सोयगाव केंद्रावर ११६ मतदानाची विक्रमी नोंद झाली असून सर्वात निच्छांकी सावळदबारा केंद्रावर ५७ मतदारांनी मतदान केले आहे बनोटी केंद्रावर ६८ मतदारांनी मतदान केले असून सोयगाव तालुक्यात २५९ पैकी महिला १६ आणि पुरुष २१९ असे एकूम २३५ मतदारांनी सोयगाव तालुक्यात मतदान केले आहे

दरम्यान पिठासन अधिकारी तहसीलदार रमेश जसवंत नायब तहसीलदार हेमंत तायडे विठ्ठल जाधव विजय कोळी शरद पाटील अनिल पवार आदींच्या पथकाने मतदान प्रक्रिया वर लक्ष ठेवून शांततेत मतदान पार पाडले यावेळी सोयगाव चे पोलीस निरीक्षक अनमोल केदार फर्दापुरचे सहायक पोलिस निरीक्षक देविदास वाघमोडे आदींनी बंदोबस्त ठेवला होता.

हे पण वाचा

टीम झुंजार