नाशिक :- सातपूर परिसरातील राधाकृष्ण नगर येथील फळ व्यवसाय करणाऱ्या शिरोडे कुटुंबातील वडील व दोन तरुण मुलांनी एकाच वेळी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना (दि. 29 जानेवारी)रोजी घडली आहे. सावकारांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याची सुसाईड नोट पोलिसांच्या हाती लागली असून, याप्रकरणी आता येथील 21 खाजगी सावकारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील 10 जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
या बाबत माहिती अशी की नाशिकच्या सातपूर परिसरातील अशोक नगर बस स्थानकाजवळ फळ विक्री व्यवसाय करणारे दीपक सुपडू शिरोडे (वय, 55), मोठा मुलगा प्रसाद शिरोडे (वय, 25) आणि लहान मुलगा राकेश शिरोडे (वय, 23 ) यांनी रविवार (दि. 29)रोजी दुपारी तीन ते साडेतीन वाजेच्या सुमारास आपल्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असता पोलिसांना आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेली एक चिठ्ठी मिळाली होती. या चिठ्ठीमध्ये खासगी सावकारांच्या तगाद्याला कंटाळून आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलत असल्याचा उल्लेख केला होता. तसेच, या चिठ्ठीमध्ये जवळपास 21 खासगी सावकारांची नावे लिहून ठेवण्यात आलेले पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यातील दहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
या सावकारांचा उल्लेख : चिठ्ठीत केलेल्या उल्लेखावरून आणि प्रतिभा दीपक शिरोडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित एम. आर. धामणे, राजाराम दा. काळे, मुकेश भी. लोहार, भास्कर सोनवणे, मुकेश सोनवणे, शांताराम नागरे रा. पिंपळगाव, संजू पाटील रा. शिवाजीनगर, शेखर पवार रा. शिवाजीनगर, प्रकाश व्ही. गोन्हे, नलिनी शेलार, बाविस्कर रा. अशोकनगर, कैलास गोराणे, भूषण चौधरी, गरीब नवाज, भरत वंजी पाटील, किरण बोडके, गिरीश खटाडे, मुरली पाटील, अरुणा पाटील, आकाश इंगळे, शरद पिंगळे यांच्या विरोधात कर्जाची रक्कम वसुलीसाठी मयत यांच्या घरी आणि दुकानावर येऊन समक्ष तसेच फोनवरून शिवीगाळ आणि धमकी देत छळवणूक करीत आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सावकारांचा जाच : काही दिवसांपूर्वी इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गौरव आणि नेहा जगताप या दांपत्याने पैसे वसुलीच्या तगाद्याला कंटाळून आत्महत्या करीत आपली जीवनयात्रा संपवली होती. आत्महत्या करण्यापूर्वी लिहून ठेवलेल्या सुसाईड नोटमुळे या घटनेचा खुलासा झाला. त्यानुसार इंदिरानगर पोलीस ठाण्यात युनूस मणियार आणि मयूर बैरागी या दोघा संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सकाळी झाली मुलगी आणि दुपारी वडिलांची आत्महत्या
खाजगी सावकाराच्या त्रासाला कंटाळून वडील आणि दोन मुलांनी आत्महत्या केली. त्यातील मोठा मुलगा प्रदीप शिरोडे याला काल सकाळी मुलगी झाली त्यांची पत्नी मुंबईला माहेरी असून रविवारी सकाळी कन्येला जन्म दिला. परिवारात लक्ष्मीचे आगमन झाले अशी आनंदाची वार्ता शिरोडे कुटुंबीयांनी सर्वांना सांगितली होती. मात्र घरात आनंदाचे वातावरण असतानाच शिरोडे कुटुंबातील तिघांनी जीवन यात्रा संपवण्याचा निर्णय घेतला. यामुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
हे पण वाचा
- जळगावात एमआयडीसी पोलिसांनी अवैध दारूभट्ट्या केल्या उध्वस्त; 7 लाखांचा मुद्देमालासह 27 जण ताब्यात.
- आजचे राशी भविष्य बुधवार दि.१९ मार्च २०२५
- Viral Video: दोन महिला शिक्षिकांमध्ये आधी वाद मग एकमेकांचे कपडे फाडत, झिंज्या उपटत शाळेतल्या मुलांसमोर फ्री स्टाईल हाणामारी, पहा व्हिडिओ.
- खळबळजनक! आधी दोन्ही अल्पवयीन मुलांची हत्या करून आई-वडिलांनी संपविली जीवन यात्रा, मृत्यूआधीचं पत्र वाचून तुमचेही डोळे पाणावतील.
- औरंगजेबाची कबर हटविण्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक, एरंडोल प्रांताधिका-यांना दिले निवेदन.