एरंडोल:- नासिक विभागीय पदवीधर निवडणुकीसाठी एरंडोल येथे दोन मतदान केंद्र तहसील कार्यालयात ठेवण्यात आले होते. तहसीलदार याच्या दालनात बूथ क्रमांक 77 व नायबतहसीलदार यांच्या दालनात बूथ क्रमांक 78 ठेवण्यात आला होता.
बुथ क्रमांक 77 मध्ये एकूण 704 पदवीधर मतदार होते त्यापैकी 450 पदवीधर मतदारांनी आपला हक्क बजावला. बूथ क्रमांक 78 येथे 401 पदवीधर मतदारांपैकी 175 तर मतदारांनी आपला हक्क बजावला.
एरंडोल तालुक्यात एकूण 1105 मतदारांपैकी 625 पदवीधर मतदारांनी मतदान केले. एरंडोल येथे 56:05% मतदान झाले. सकाळपासूनच मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवली असे वाटत होते दिवसभर मतदान केंद्रावर शुकशुकाट दिसून येत होता मात्र दुपारी तीन वाजेनंतर थोड्याफार प्रमाणात मतदानासाठी गर्दी होऊन मतदारांची लाईन लागली. सायंकाळी चार वाजता तहसील कार्यालयाचे गेट बंद करण्यात आले. मतदानासाठी आलेल्या सर्व मतदारांनी सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत सर्व मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
तहसीलदार सुचिता चव्हाण, मुख्याधिकारी विकास नवाळे, गटशिक्षणाधिकारी राजेंद्र महाजन, कृषी अधिकारी बी एस मोरे, के एस गवळी,पी एल सपकाळे, जूनियर इंजिनिअर आढे, विस्ताराधिकारी धस, धनंजय सूर्यवंशी तसेच पोलीस स्टेशनचे कर्मचारी तहसील कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
हे पण वाचा
- आजचे राशी भविष्य बुधवार दि.१९ मार्च २०२५
- Viral Video: दोन महिला शिक्षिकांमध्ये आधी वाद मग एकमेकांचे कपडे फाडत, झिंज्या उपटत शाळेतल्या मुलांसमोर फ्री स्टाईल हाणामारी, पहा व्हिडिओ.
- खळबळजनक! आधी दोन्ही अल्पवयीन मुलांची हत्या करून आई-वडिलांनी संपविली जीवन यात्रा, मृत्यूआधीचं पत्र वाचून तुमचेही डोळे पाणावतील.
- औरंगजेबाची कबर हटविण्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक, एरंडोल प्रांताधिका-यांना दिले निवेदन.
- महिलेच्या पर्समधील ७ लाख ८० रुपये किमतीचे सोने चोरणाऱ्या दोघं महिलाना अमळनेर पोलिसांनी केली अटक.