अमळनेर : – येथील श्री मंगळग्रह मंदिरात दर्शनासाठी आलेल्या महिला भाविकाची मौल्यवान वस्तू असलेली पर्स जळगाव येथील भाविकाला सापडली. मनात कोणतेही लालसा न ठेवता प्रामाणिकपणे पर्स आणून दिल्याने त्या भाविकाचे कौतुक कऱण्यात येत आले.
अभिषेक, पूजा व दर्शनासाठी येथील श्री मंगळग्रह मंदिरात भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते.
मंगळवारी अमळनेर येथील महिला भाविक सुवर्णा पाटील यांची पर्स मंदिर परिसरात हरविली. या पर्समध्ये बँकेचे एटीएम, घराच्या किल्ल्या, काही मौल्यवान दागिने व महत्वाची कागदपत्रे होते. पर्स हरविल्याबाबत सुवर्णा पाटील यांच्या लक्षात येताच. त्या खूप घाबरल्या. सदर पर्स बेवारस पडल्याचे जळगाव येथील रामचंद्र पोतदार यांच्या निदर्शनास आली. त्यांनी तत्काळ मंदिराच्या चौकशी कक्षाशी संपर्क साधून सदर पर्स मंदिर प्रसासनाकडे सोपवली.
पर्स हरविल्याबाबत आवाहन करण्यात आल्यानंतर सुवर्णा पाटील रामचंद्र पोतदार यांच्या हस्ते पर्स सोपविण्यात आली.
सौ. पाटील यांना पर्स परत मिळाल्याने मंदिर प्रशासन व रामचंद्र पोतदार यांचे आभार मानले. पोतदार यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणाचे भाविकांनी कौतुक केले.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






