न्यूज by-गौरवकुमार पाटील / अमळनेर
जळगांव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एकाच आठवड्यात तीन तर दहा दिवसांत चार व धुळे जिल्ह्यातील एक मिळून अशा पाच ठिकाणी कारवाई करत लाचखोरांना रंगेहाथ पकडून लाचखोरांचे धाबे दणाणून सोडले आहे , त्यात अमळनेर तालुक्यातील निम येथे ग्रामसेवक , अडावद ता चोपडा येथील पोलीस व होमगार्ड ,आणि प्रजासत्ताक दिनी तर गारखेडा ता धरणगाव येथील ग्रामसेवकाने लाच सोडून लाच घेतली तर आज भुसावळ तालुक्यातील साकरे येथील महिला तलाठी मनीषा गायकवाड हिस तीनशे रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडून कारवाई केल्याने लाचखोरांच्या मुसक्या आवळल्या आहेत
सातबारा उताऱ्यावर नावलावण्यासाठी तीनशे रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या साकरी येथील महिला तलाठी एम. एन. गायकवाड यांना जळगाव एसीबीच्या पथकाने रंगेहात अटक केली आहे.या कारवाईमुळे महसूल विभागात प्रचंड खळबळउडाली आहे.खडका/ साकरी ता भुसावळ येथील तलाठी एम. एन. गायकवाड सातबारा उताऱ्यावर नाव लावण्यासाठी तीनशे रुपयांची लाच मागून ती खडका कार्यालयात स्वीकारली.

मंगळवारी दुपारी तीन वाजेच्या जळगाव एसीबीच्या पथकाने त्यांना सापळा रचून अटक केली. हा सापळा पोलीस उपअधीक्षक शशीकांत पाटील, नाईक ईश्वर धनगर,कॉन्स्टेबल राकेश दुसाने, एएसआय दिनेशसिंग पाटील,एएसआय सुरेश पाटील, हवालदार सुनील पाटील, हवालदार रवींद्र घुगे, शैला धनगर, किशोर महाजन,सुनील वानखेडे, प्रदीप पोळ, सचिन चाटे, प्रणेश ठाकुर आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






