स्वातंत्र्य लढ्याला उजाळा! दादासाहेब पाटील महाविद्यालयात “पोस्टर्स प्रदर्शनाचे” आयोजन.

Spread the love

एरंडोल- येथील दादासाहेब दिगंबर शंकर पाटील महाविद्यालय आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै.दिगंबर पाटील (माजी आमदार) यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विद्यार्थ्यांनी “भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील अज्ञात स्वातंत्र्यसैनिक” या विषयावरील पोस्टर्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.आमदार चिमणराव पाटील यांच्याहस्ते प्रदर्शनाचे उदघाटन करण्यात आले.संस्थेचे अध्यक्ष अमित पाटील अध्यक्षस्थानी होते.प्रांताधिकारी विनय गोसावी,तहसीलदार सुचिता चव्हाण,पालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी विकास नवाळे,सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश अहिरे प्रमुख पाहुणे होते.

स्पर्धेत विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झालेल्या १६ अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांच्या जीवनावर व कार्यावर आधारित पोस्टर सादर केले होते.नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यासमवेत काम करणारे नीरा आर्य,कॅप्टन लक्ष्मी सहगल,१९४२ च्या स्वातंत्र्य चळवळीत भाग घेणारे आडगाव येथील हुतात्मे भगवान भुसारी,शामराव पाटील,त्र्यंबक वाणी,तसेच लढ्यात सहभागी झालेले डॉ.ब.तु.राठी,माजी आमदार दिगंबर पाटील यांच्या आठवणींना पोस्टर स्पर्धेच्या माध्यमातून उजाळा देवून त्यांच्या कार्याची माहिती देण्यात आली होती.देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी बलिदान दिले

मात्र त्यांच्या कार्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचली नाही त्यामुळे पोस्टर स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही त्यांच्या कार्याला उजाळा देण्याचा प्रयत्न केला असल्याची प्रतिक्रिया स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.स्पर्धेत कविता गजानन गवांदे हिने प्रथम क्रमांक पटकावला तर कोमल पाटील हिने द्वितीय व प्राजक्ता महाजन हिने तृतीय क्रमांक प्राप्त केला.यावेळी आमदार चिमणराव पाटील यांनी पोस्टर स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांची भेट घेवून त्यांचे कौतुक केले.स्वातंत्र्य लढ्यातील स्वातंत्र्य सानिकांच्या बलिदानाची माहिती स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्याना मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमास बाजार समितीचे माजी सभापती शालिग्राम गायकवाड, उपप्राचार्य डॉ.अरविंद बडगुजर,काबरे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका रोहिणी मानुधने,माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी,देविदास महाजन,रवींद्र महाजन, प्रा. आर.एस. निकुंभ, जगदीश ठाकूर यांचेसह विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.स्पर्धेसाठी प्राचार्य एन. ए. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.डॉ.हेमंत पाटील,सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.मीना काळे,प्रा.डॉ.बालाजी पवार, प्रा.एस.पी.वसावे यांचेसह विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.

हे पण वाचा

टीम झुंजार