निंभोरा बु|| .
परमानंद शेलोडे
निंभोरा ता . रावेर :- येथील छत्रपती संभाजी नगर येथे श्री. शिव मंदिर नवनिर्माण करण्यात येणार आहे.
मंदिरातील मूर्ती प्राणप्रतिष्ठा आणि कलशारोहण या निमित्त ३ दिवसीय भव्य पूजेचे आयोजन केलेले असून दि. ३१ जानेवारी. २०२३ ला सुरू होत असलेल्या या कार्यक्रमात पंचक्रोशीतील भजनी मंडळी सोबत शिवलिंग व श्रीगणेश मूर्ती मिरवणुक व दिंडी सोहळा आयोजित केलेला आहे.
त्यानंतर दि. १ फेब्रुवारी ते ३ फेब्रुवारी असे तीन दिवस होमहवन होणार असून, ३ फेब्रुवारी शुक्रवार या दिनी दुपारी १२ वाजेपर्यंत मूर्ती प्राणप्रतिष्ठा पूर्ण आहुती होऊन देव सिंहासनी बसविले जातील, त्यानंतर मंदिर समिती अध्यक्ष श्री ह.भ.प. सुभाष महाराज पाटील, निंभोरा बु|| (आळंदी) यांचे काल्याचे किर्तन होईल. तसेच ४ फेब्रुवारी २०२३ शनिवार या दिवशी ग्रामभोजन भंडारा महाप्रसाद होईल.
श्री.ह.भ.प. सुभाष महाराज पाटील (आळंदी शिक्षण संस्था) यांच्या समवेत खजिनदार व संपूर्ण समिती यांच्या अथक प्रयत्नातून नवनिर्माण मंदिराचे उभारणी होत असून भाविकांनी या सुवर्ण महायोगाचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर समिति तर्फे केले आहे.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






