Pimpari Chinchwad Bull Viral Video : सध्या देशात सोशल मीडिया वर रोज नवीन नवीन व्हिडिओ व्हायरल होत असतात असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. बैल हा तसा शांत प्रवृत्तीचा प्राणी आहे. तुम्ही आपलं काम करा, मी माझं काम करतो अशा आवेगात तो आपलं आयुष्य जगतो. पण, एकदा का बैलाला राग आला की मग काही खरं नाही. बैलाने रागात व्यक्तीला उचलून फेकल्याचे अनेक व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील, अशाच एका संतापलेल्या बैलाचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
या बैलाने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या व्यक्तीला चक्क शिंगावर घेऊन उचलून फेकलं आहे. हा संपूर्ण प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद (Viral Video) झाला आहे. सुदैवाने या घटनेत व्यक्तीला गंभीर दुखापत झाली नाही. मात्र, त्याला मुका मार लागल्याचं परिसरातील नागरिकांकडून सांगितलं जातं आहे.
अंगावर काटा आणणारी ही घटना पिंपरी-चिंडवड (Pimpri Chinchwad) शहरात घडली आहे. गेल्या काही दिवसांपासून पिंपरी गावात नव महाराष्ट्र् विद्यालयाच्या मागे व वाघेरे कॉलोनी रस्त्यावर मोकाट जनावरे व कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. रस्त्यावर फिरणारी मोकाट जनावरे वाहनधारकांना त्रास देत आहेत.
पहा व्हिडिओ :
व्हिडीओत काय आहे?
व्हायरल झालेल्या व्हिडीओत दोन व्यक्ती रस्त्याच्या कडेला उभे राहून निवांत गप्पा मारताना दिसून येत आहे. यादरम्यान, एक मोकाट बैल रस्ता ओलांडून हळूच त्यांच्याकडे येतो. काही समजण्याच्या आतच हा बैल उभ्या असलेल्या दोन व्यक्तीपैकी एकाला शिंगावर उचलून घेतो आणि दूर फेकतो.
ही घटना घडल्यावर लगेच आजूबाजूचे लोक पळत येतात आणि या व्यक्तीला उचलून बाजूला करतात. सुदैवाने या व्यक्तीला घटनेत कुठलीही गंभीर दुखापत झाली नाही. मात्र, तरी देखील त्यांना मुका मार लागला असल्याचं सांगितलं जातंय. अंगावर काटा आणणारी ही घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
हे वाचलंत का ?
- Viral Video:परमेश्वरा अशी सून नको रे बाबा! आजारग्रत सासू अन् सासऱ्याला डॉक्टर सूनेची अमानुषपणे मारहाण पाहुन व्हिडिओ तुम्हीपण अवाक् व्हाल.
- पत्नीने प्रियकराला बोलावले घरी, अचानक पती आला घरी त्याने पत्नीस प्रियकरा सोबत नको त्या अवस्थेत पाहून पतीच्या संयम सुटला अन्……
- सैनिक एन्क्लेव्ह मधील एका रूममध्ये आठ मुली, बाहेर मुलांची तोबा गर्दी, पोलिसांना आला संशय अचानक टाकला छापा,अन् त्यांना धक्का बसला….
- जळगाव तालुक्यात भरदिवसा माजी उपसरपंचावर चाकू आणि चॉपरने वार करून केली निघृण हत्या.घरच्यांचा आक्रोश.
- नातवाने पत्नीची हत्या करून स्वत:ही संपविले जीवन; ज्या नातूसअंगाखांद्यावर खेळवल तो डोळ्यासमोर गेल्याने आजोबांनी पेटत्या चितेत उडी मारून दिला जीव.