भडगाव :- सध्या महाराष्ट्रात अपघातच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे अश्यातच जळगाव जिल्ह्यातील पोलीस भरतीसाठी सराव करणाऱ्या तरुणाचा रस्त्यावर धावतांना अपघाती मृत्यू झाला आहे. भडगाव तालुक्यातील कजगाव येथे सोमवारी सकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. रोहित अशोक मराठे (वय १८) असे मयत तरुणाचे नाव आहे. पोलिस होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणाचा अपघाती मृत्यू झाला आहे. रस्त्यावर धावण्याचा सराव करताना अज्ञात वाहनाचा धडकेत मृत्यू झाला आहे.
कजगाव येथे रोहित अशोक मराठे हा कुटुंबियांसोबत वास्तव्यास आहे. रोहित याचे पोलीस होण्याचे स्वप्न असून पोलीस भरतीसाठी तो सराव करत होता. सोमवारी सकाळी रोहित हा नेहमीप्रमाणे आपल्या मित्रांसोबत भडगाव रस्त्यावर धावण्याचा सराव करण्यासाठी गेला होता. यादरम्यान चाळीसगावकडून भडगावकडे जाणाऱ्या अज्ञात वाहनाने रोहितला मागून जोरदार धडक दिली.
वाहनाच्या जोरदार धडकेत रोहित मराठे याच्या डोक्याला जबर मार लागल्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. यावेळी रोहित सोबत असलेल्या वैभव बोरसे, हर्षल पाटील, दत्तू महाजन या मित्रांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच दादाभाऊ पाटील, रवी मालचे, अशोक पाटील हे सुध्दा मदतीला धावले होते. जखमी रोहितला पुढील उपचारासाठी १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेतून चाळीसगाव येथील रुग्णालयात दाखल केले होते. मात्र रस्त्यातच रोहितची प्राणज्योत मालवली होती. रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले.
रोहित हा भडगाव येथील न्यू इंग्लिश माध्यमिक शाळेत बारावी विज्ञान शाखेत शिक्षण घेत होता. त्याचे कुटुंबिय शेती करुन आपला उदरनिर्वाह करतात. मयत रोहीत मराठे यांच्या पश्चात वडील, आई, भाऊ, बहीण असा परिवार आहे. रोहितचे पोलीस होण्याचे स्वप्न होते. पोलीस होऊन कुटुंबांची परिस्थिती सुधारावी अशी त्याची इच्छा होती. यासाठी तो आपल्या मित्रांसोबत सकाळी, सायंकाळी भरतीसाठी तसेच नित्याने व्यायामाचा सराव सुरू होता. मात्र अपघाताच्या रुपाने त्याच्यावर काळाने झडप घातली होती व पोलिस होण्याचे त्याचे स्वप्न अपूर्ण राहिले.
रोहितच्या मृत्यूने त्याच्या मित्रांना मोठा धक्का बसला आहे. दरम्यान ग्रामीण भागात आजही सुसज्य अशी मैदाने नसल्याने मुले रस्त्यावर धावतात, व त्यात अशा अपघाताच्या घटना घडतात. त्यामुळे गावात क्रीडांगणे व्हावीत, जेणेकडून घटना टाळता येतील, अशी मागणी नागरिकांमधून तसेच तरुणांमधून केली जात आहे.
हे वाचलंत का ?
- VIDEO: कुटुंबानं खरंच यमराजाला दिला चकवा!काच फोडून कारमध्ये शिरल्या लोखंडी सळ्या; पहा नशीब अन् कर्मावर विश्वास बसणार नाही असा व्हिडिओ.
- नवरदेव आला मंडपात, इतक्यात नवरीचा वडिलांनी तिच्या मृत्यूची बातमी सांगितली,नवरदेवाला आला संशय अन् हादरवणारे सत्य आलं समोर.
- बाबागिरी करणाऱ्या मौलवीने 17 वर्षीय निष्पाप मुलाची निर्घुण हत्या करून मृतदेहाचे तुकडे करून दुकानात पुरले,साडे चार वर्षानी गुढ उकललं.
- दोन मुलांची आई प्रियकराच्या प्रेमात आंधळी, पत्नीने प्रियकराला बोलवले घरी दोघांना सोबत पाहून पतीची तळपायाची आग मस्तकात गेली, मग पुढे सुरू झाला हायहोल्टेज ड्रामा.
- पती खूनाच्या आरोपात अटकेत त्याला वाचवण्याच्या नादात पत्नीनं भलतचं केलं, पोलिसांवर केलेल्या गंभीर आरोपात तीन पोलिस निलंबित,काय आहे प्रकरण.