चोरट्यांनी पिकांना पाणी भरणा करतांनाच पाईप केले चोरी–जरंडी शिवारातील रात्रीची घटना

Spread the love

सोयगाव, दि.०२.(साईदास पवार)..वीज पंप पासून जोडणी केलेल्या पाईप वरच चोरट्यांनी डल्ला मारून वीस पाईप चोरी केल्या ची घटना बुधवारी रात्री जरंडी शिवारात उघडकीस आली आहे या घटनेत शेतकऱ्यांच्या शेतातील दहा हजार सहाशे रु चा अज्ञात चोरट्यांनी पसार केला आहे याप्रकरणी अद्यापही सोयगाव पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद नव्हती

जरंडी शिवारात वसंत सीताराम पाटील यांचे गावालगत गट क्र.३०३ शेती आहे रब्बीच्या मका पिकांना रात्री पाणी भरती करत असताना अज्ञात चोरट्यांनी पुढे भरणा चालू असताना मागे पाईपलाईन कापून वीस पाईप ची चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे

दरम्यान जरंडी निंबायती शिवारात वीज पंप आणि शेती उपयोगी साहित्य चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणावर उघड होत आहे यावर पोलिसांनी वेळीच आळा घालावा अशी मागणी होत आहे…निंबायती जरंडी कवली बहुलखेडा घोसला आदी भागात शेती क्षेत्रात चोरीचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे…

हे पण वाचा

टीम झुंजार