संधी मिळाल्यास कन्नड-सोयगाव मधून निवडणूक लढणार-तूर्तास कार्यकर्त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी दौरा -संजना जाधव

Spread the love

सोयगाव, दि.०२.(साईदास पवार)..संधी मिळाल्यास कन्नड-सोयगाव मधून विधानसभा निवडणूक लढविणार आहे पण त्या आधी मला सर्वच राजकीय पक्षाना ताकद दाखवेल सध्या सोयगाव-कन्नड या दोन्ही तालुक्यातील शेतकरी हवालदिल झालेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना ऊर्जा मिळावी यासाठी कन्नड तहसिल कार्यालयावर (दि.२१) फेब्रुवारी ला पीकविम्याचा आणि अतिवृष्टीच्या अनुदानाचा प्रश्न घेऊन मोर्चा काढण्यात येणार आहे त्या मोर्चा चे निमंत्रण देण्यासाठी मी सोयगाव तालुक्यात आली आहे अशी भूमिका संजनाताई जाधव यांनी गुरुवारी सोयगाव तालुक्यातील भेटी दरम्यान स्पष्ट केली आहे.

सोयगाव तालुक्यातील माझ्या कार्यकर्त्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी मी आलेय सध्या विधानसभा निवडणुक लढण्याची भूत माझ्या डोक्यात नाही कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडू नये त्यासाठी मी आले असल्याचे त्यांनी भूमिकेतून मांडले सोयगाव तालुक्यात दस्तपूर काळदारी किन्ही तिडका नांदगाव नांदगाव तांडा घोसला निमखेडी उमर विहिरे निंबायती आदी गावांचा भेटी दौरा त्यांनी पूर्ण केला यावेळी त्यांनी सोयगाव तालुक्यातील रस्त्याची अवस्था बिकट असल्याची भूमिका मांडली सोयगाव तालुक्यातील मंजूर रस्त्या च्या कामांवर स्थगिती आहे ही स्थगिती उठविण्यात यावी यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांची भेट घेऊन त्यांना रस्त्या च्या कामांची स्थगिती

उठविण्यासंदर्भात पत्र देऊन विनंती करणार असल्याचे त्यांनी सांगून मार्च अखेरीस नंतर दुसऱ्या टप्प्यात सीयगाव तालुक्यातील उर्वरित गावांचा पोकरा योजनेमध्ये समावेश करण्यासाठी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना विनंती करून या गावांचा पोक्रा योजनेत समावेश करेल असेही त्यांनी सांगितले मात्र पीकविम्या आणि अतिवृष्टीच्या अनुदानासाठी कन्नड तहसिल कार्यालयात आयोजित (दि.२१) मोर्चा मध्ये सोयगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना सहभागी होण्यासाठी त्यांनी आवाहन करून निमंत्रण दिले आहे यावेळी त्यांच्या सोबत निलेश मगर तात्याराव वाडेकर प्रमोद खैरनार दिनेश जाधव आदींची उपस्थिती होती.

हे पण वाचा

टीम झुंजार