एरंडोल येथे जगतगुरू तुकाराम महाराज यांची जयंती उत्साहात साजरी

Spread the love

एरंडोल :- येथे पाटील वाडा या ठिकाणी आज दिः ०२ फेबुवारी २० २३ रोजी जगतगुरू तुकाराम महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली . सर्वप्रथम श्री शिवाजीराव अहिरराव सर यांच्या हस्ते जगत्गुरू तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यकमाचे प्रास्ताविक श्री मनोजभाऊ पहेलवान यांनी केले . आभार प्रदर्शन श्री आर. एस पाटील सर यांनी केले. व इतर मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले . मनोगतामध्ये मान्यवरांनी जगतगुरू तुकाराम महाराज यांचा क्रांतीकारक जिवनपट उलगडला व संपुर्ण महाराष्ट्रात २ फेबुवारी हा दिवस तुकाराम महाराज यांची जयंती सगळीकडे साजरी होत असल्याबददल समाधान व्यक्त केले .

तसेच ४०० वर्षापूर्वी वैदिकांचा कर्दनकाळ ठरलेले , तसेच आपल्या अभंगाच्या माध्यमातुन अनिष्ठ रुढी परंपरा, अंधश्रद्धा व धार्मिकतेच्या मुळावर घाव घालुन बहुजन समाजाला अज्ञानाच्या अंधकारातून मुक्त करणारे कांतीकारक संत म्हणजे तुकाराम महाराज होय .
तसेच कर्जखाते इंद्रायणी नदीत बुडवुन जगात शेतकऱ्यांना पाहिली कर्जमाफी देणारे व शिवरायांचे खरे गुरु म्हणते संत तुकाराम महाराज होय. अशा या महान कांतीकारक संताच्या कार्याला उजाळा अनेक मान्यवरांनी दिला .या कार्यक्रमाप्रसंगी श्री अहिरराव सर , डॉ सुरेश पाटील , प्राधापक मनोजभाऊ पहेलवान , आर्शिवाद भाऊ पहेलवान , मगेशदादा पाटील ,

आर एस पाटील सर , सुभाष पाटील , अरुण पाटील , मनोजआप्पा पाटील , रामचंद्र पाटील , आर डी पाटील , ऋषिकेश पाटील , डॉ प्रशांत पाटील , रविंद्र पाटील , डॉ प्रमोद पाटील , दत्तात्रय पाटील , डॉ शामकांत पाटील , शांताराम अपार , व इतर मान्यवर उपस्थित होते.
कार्यकमाच्या यशस्वितेसाठी पंकज पाटील , हेमंत पाटील , शरद पाटील , समाधान पाटील , पवन पाटील , राज पाटील , विनय पाटील , हर्षल पाटील , शाम सुर्यवंशी , गोटु पाटील , स्वप्निल सावंत सर , राकेश पाटील सर यांनी मेहनत घेतली .

हे पण वाचा

टीम झुंजार