बाळासाहेबांची शिवसेना पक्षाची अमळनेर शहर व तालुक्याची कार्यकारणी जाहीर.

Spread the love

पारोळा : – अमळनेर शहर व तालुक्यात शिवसेनेच्या सुरूवातीपासुन शिवसैनिक रूजलेले आहेत. परंतु गेल्या काही वर्षांपासुन संघटनात्मक बांधनी, शिवसेनेचे विचार तळागळात पोहोचविण्यासाठी अपुर्ण संघटन कौशल्य व अनेक अडचणींमुळे संघटना विखुरली गेली होती. त्यास आता नवसंजीवनी देवुन शिवसेनेचे विचार तळागळात पोहोचविण्यासाठी वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने, शिवसेना मुख्य नेते मा.एकनाथजी शिंदे साहेब (मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य) यांच्या आदेशानुसार

आमदार मा.आबासाहेब चिमणरावजी पाटील यांच्या नेतृत्वात अमळनेर शहरप्रमुखपदी संजय कौतिक पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुखपदी सुरेश अर्जुन पाटील, उपजिल्हाप्रमुखपदी महेश प्रभाकरराव देशमुख, तालुका संघटकपदी डाॕ.दिपक पंढरीनाथ पाटील, उपतालुकाप्रमुखपदी चंद्रशेखर ताराचंद पाटील, शहर संघटकपदी साखरलाल शांताराम माळी, उपशहरप्रमुखपदी प्रविण पुरूषोत्तम पाटील, युवासेना तालुकाप्रमुखपदी गुणवंत बापुराव पाटील, युवासेना शहरप्रमुखपदी भरत प्रकाश पवार व युवासेना उपशहरप्रमुखपदी विजय उगलाल पारधी यांची नियुक्ती करण्यात आली.

यावेळी आमदार मा.आबासाहेब चिमणरावजी पाटील यांनी सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी पारोळा कृषि उत्पन्न बाजार समितीचे मा.सभापती तथा जळगांव जिल्हा बँकेचे संचालक मा.अमोलदादा पाटील, जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील, तालुकाप्रमुख मधुकरआबा पाटील, बबलुदादा पाटील, प्रथमेश पवार, प्रा.बी.एन.पाटील सर यांचेसह शिवसैनिक बांधव उपस्थित होते.

हे पण वाचा

टीम झुंजार