How to get rid from acidity : या टिप्स जेवणादरम्यान लक्षात ठेवल्या तर हा त्रास टाळता येऊ शकतो.
खाण्यापिण्यातील अनियमितता, फास्ट फूडचं अतिसेवन यामुळे पोटाचे त्रास उद्भवतात. छातीत जळजळ उद्भवल्यास व्यवस्थित जेवणही जात नाही ना झोप लागत. (How to get rid from acidity) एसिडीटीपासून बचाव करण्यासाठी डॉक्टर अमृता कुलकर्णी यांनी काही सोप्या टिप्स सांगितल्या आहेत. या टिप्स जेवणादरम्यान लक्षात ठेवल्या तर हा त्रास टाळता येऊ शकतो.
- १) रोजच्या जेवणाची वेळ फिक्स ठेवा
- २) दिवसभरात २ ते अडीच लिटर पाणी प्या
- ३) दोन जेवणांच्या दरम्यान ४ तासांपेक्षा जास्त गॅप असू नये.
कोरफड :

कोरफड त्वचेसोबतच आरोग्यासाठीही खूप उपयुक्त आहे. कोरफडीचा रस देखील अपचनावर उपचार करण्यासाठी खूप फायदेशीर आहे. यात अँटी-ऑक्सिडेंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आहेत. कोरफडीचा रस बनवण्यासाठी प्रथम कोरफडीचे पान कापून त्यातून जेल काढा, त्यानंतर ते पाण्यात मिसळा आणि चांगले विरघळवा. त्रास होत असेल तर हा रस प्यायल्याने आराम मिळतो.
आलं :

आल्यामध्ये औषधी गुणधर्म असतात जे अनेक आजारांपासून तुमचे रक्षण करतात. गॅसची समस्या दूर करण्यासाठी आले विशेष फायदेशीर आहे. हा चहा गरम पाण्यात उकळून त्याचे सेवन करू शकता.
दालचिनी :

दालचिनी गॅसपासून मुक्त होण्यास देखील मदत करते. कोमट पाण्यात आणि थोडे मध मिसळून दालचिनीचे सेवन केल्याने गॅसची समस्या दूर होते.
तुळशीची पानं :

तुळशीच्या पानांमुळे अॅसिडीटी आणि गॅसपासून त्वरित आराम मिळतो. यासाठी एक कप पाण्यात तुळशीची काही पाने टाकून उकळा, त्यानंतर पाने गाळून प्या. याच्या मदतीने तुम्ही गॅस आणि अॅसिडिटीपासून मुक्त होऊ शकता. अॅसिडिटीसाठी हा एक उत्तम घरगुती उपाय आहे.
लिंबाचा रस :

लिंबाच्या रसात बेकिंग सोडा मिसळून प्या. हा उपाय आरोग्यासाठी तसेच गॅसपासून मुक्ती मिळवण्यासाठी फायदेशीर आहे. यामुळे तुमच्या आत निर्माण होणारा वायू बाहेर काढण्यात मदत होऊ शकते.
हे वाचलंत का ?
- 33/11 केव्ही क्षमतेचा उपकेंद्राचे शिरसमणी येथे आमदार मा.अमोलदादा पाटील यांच्या शुभहस्ते भुमीपुजन….
- चाळीसगाव तालुक्यात वीज पडून तिघांचा मृत्यू, एकजण जखमी.
- एरंडोल चे माजी नगराध्यक्ष अपघातात गंभीर जखमी; माजी नगरसेविका पत्नी कल्पना महाजन यांनी केली घातपात असल्याची तक्रार.
- जिल्ह्यात गावठी कट्टे विकणाऱ्यां दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी केले जेरबंद; 1 लाख 70 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त.
- 60 वर्षीय व्यक्तीने विधवा महिलेवर केला बलात्कार, नराधमास धडा शिकविण्यासाठी लैंगिक अत्याचार झालेल्या अनेक महिलांनी आरोपीस जिवंत जाळले