निंभोरा प्रतिनिधी / परमानंद शेलोडे.
रावेर :- तालुक्यातील कांडवेल येथे खोटे व बनावट सर्व्हे नंबरची माहिती देवून सन २०२२-२३ या वर्षामध्ये शासनाचे अतिवृष्टी अनुदान लाटले या बाबत तक्रारदार दादाराव गुलाब पाटील यांच्या मालकीच्या गट नंबर ६७/२/१/२/२ या क्षेत्राचे चुकीचे पंचनामे करून शेतकऱ्यांचे नुकसान केल्याबाबत त्यांनी वारंवार रावेर तहसील कार्यालयात या प्रकरणाबाबत संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी या करिता पाठपुरावा करूनही रावेर तहसीलदार यांनी कोणत्याही प्रकारची दखल न घेतल्याने त्यांना न्याय न मिळाल्याने आज दि.४फेब्रू २३रोजी त्यांनी सकाळी १० वाजेपासून कांडवेल येथील तापीनदी पात्रात जलसमाधी आंदोलन सुरू केले होते.
तसेच कांडवेल येथील रत्नाबाई सुरेश पाटील,यांचा गट नंबर १५८/१ क्षेत्र ०.७०हे आर हा ७/१२ महसूल दप्तरी उपलब्ध नाही.ईश्वर सुरेश पाटील, व सुनील सुरेश पाटील व इतर यांनी लबाडी करून शासकीय अनुदान मिळविण्याकरिता संगनमताने शासकीय यांचेशी हातमिळवणी करून त्यांचे मार्फत खोटे रेकॉर्ड तयार केले.तसेच खोटे व बनावट सर्व्हे नंबर दाखवून शासनाची दिशाभूल करून सन २०२२-२३ या वर्षाचे अतिवृष्टी अनुदानित रक्कम स्वतःचे फायद्यासाठी मिळवली आहे.संबंधित लोकांनी या पूर्वी देखील शासकीय अधिकारी यांचेशी संगनमत करून खोटे व बनावट माहितीच्या आधारे शासकीय अनुदान लाटण्याचे गैरकृत्य केले आहे.
तरी संबंधितांवर गुन्हे दाखल करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे.तसेच दुपारी २वाजेच्या सुमारास रावेर येथील नायब तहसीलदार संजय तायडे यांनी आंदोलन स्थळी दादाराव पाटील यांची भेट घेतली असता योग्य ती चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येतील असे लेखी आश्वासन दिल्यानंतर जलसमाधी आंदोलन तूर्त मागे घेण्यात आले आहे.सदर ठिकाणी मंडळ अधिकारी मीना तडवी,तलाठी श्याम तिवाडे,पोलीस पाटील, सरपंच,गावातील प्रतिष्ठित नागरिक आदी उपस्थित होते.तसेच ठिकाणी निंभोरा पोलीस स्टे एपीआय गणेश धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हेका ज्ञानेश्वर चौधरी,पो.ना ईश्वर चव्हाण,पो.ना स्वप्नील पाटील, यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
हे वाचलंत का ?
- Viral Video: ‘पापा की परी’ रीलच्या नादात धबधब्या जवळ जातांना अचानक……जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका पहा व्हिडिओ.
- महिन्याभरापूर्वीच विवाह झालेल्या नवविवाहित जोडप्याचा बाथरूममध्ये गॅस गिझरच्या गळतीमुळे दुर्दैवी अंत…..
- भुसावळ येथील गोडाऊन मधून 35 लाख रुपयांच्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तु चोरीच्या गुन्हा उघडकीस; शिरपूर येथून मुद्देमालासह दोघांना घेतले ताब्यात.
- भूसंपादनाचा वाढीव मोबदला न दिल्याने महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयातील साहित्याची पारोळ्याच्या शेतकऱ्यांनी केली जप्ती.
- ऑनलाईन जुगारामुळे कर्जबाजारी झालेल्या विवाहित तरुणाने दोन वर्षांच्या मुलासह पत्नीला विष दिलं, मग स्वतःनेही संपविले जीवन.