वराड येथे 50 विजचोरी करणाऱ्या ग्राहकांवर कारवाई ‌होणार

Spread the love

वावडदा ता जळगाव (सुमित पाटील) प्रतिनिधी दि.५ जवळच असलेल्या वराड.सुभाषवाडी येथे महावितरण कंपनी कनिष्ठ अभियंता निगडे साहेब यांच्या आदेशानुसार असलेल्या ग्राहकांचे विजचोरी कारवाई करण्यात आली यात ५० ग्राहकावर विजचोरी कारवाई करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या मिटरची मिटर टेस्टिंग युनिट येथे तपासणी करून वीज चोरीचे देयक सदर ग्राहकांना अदा करण्यात येतील व सदर वीज बिल न भरल्यास त्या ग्राहकांवर तत्काळ वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे..

सदर कारवाईमुळे परिसरातील वीजचोरामध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली. या वेळी महावितरण वावडदा युनिट चे कर्मचारी साहेब समीर निगडे,लाईनमन लुकमान तडवी, व,तंत्रज्ञ संतोष पाटील,अमोल भगत, दिनेश पाटील, शिवाजी काळे, संतोष सरदार, संजय तडवी,जीवन रोकडे,प्रदीप खवडे, किरण पाटील यांनी ही कारवाई केली.

हे पण वाचा

टीम झुंजार