3 Easy Exercise For Knee Pain : काही सोपी योगासने केल्यास त्याचा निश्चितच फायदा होतो.
गुडघेदुखी ही अशी समस्या आहे की ती एकदा सुरू झाली की आपल्या हालचालींवर बंधने यायला लागतात. पाय हे आपल्या एकूण हालचालीतील महत्त्वाचा घटक असल्याने पायाला कोणत्या प्रकारची इजा झाली तर आपल्या हालचालीच थांबतात किंवा मंदावतात. गुडघा हा पायाला जोडणारा एक मुख्य सांधा असल्याने त्याच्या कार्यात अडथळे आल्यास हालचालींवर बऱ्याच मर्यादा येतात. उठणे, बसणे, चालणे अशा सगळ्याच गोष्टी आपण गुडघ्याच्या माध्यमातून करत असतो. गुडघा चांगला काम करत असेल तर या गोष्टी आपल्या लक्षातही येत नाहीत. पण गुडघ्याचे दुखणे सुरू झाल्यानंतर आपल्याला त्याची खरी किंमत कळते.
गुडघेदुखी सुरू झाली की आपण डॉक्टरांकडे जातो. मग काही वेळा औषधे, मलम देऊन हे दुखणे आटोक्यात आणले जाते. अन्यथा व्यायाम, फिजिओथेरपी यांच्या माध्यमातून गुडघेदुखीवर उपाय केला जातो. गुडघ्याच्या वाटीची झीज झाल्याने किंवा त्यातील वंगण कमी झाल्याने गुडघ्याच्या तक्रारींना ठराविक वयानंतर सुरुवात होते. गुडघेदुखी ही अतिशय सामान्य समस्या असून त्यावर वेळीच उपाय न केल्यास हा त्रास वाढत जाण्याची शक्यता असते. म्हणूनच गुडघेदुखी सुरू होऊ नये म्हणून किंवा झाली असल्यास आटोक्यात राहण्यासाठी काही सोपी योगासने केल्यास त्याचा निश्चितच फायदा होतो. प्रसिद्ध योग अभ्यासक जूही कपूर हे सोपे व्यायामप्रकार सांगतात. ते अगदी ५ मिनीटांत होणारे असून नियमितपणे केल्यास निश्चितच फायदा होतो.

- १. चौड्यांवर चालावे, पायाच्या मागच्या स्नायूंचा व्यायाम होण्यासाठी असे चालणे अतिशय फायदेशीर ठरते. किमान २ फेऱ्या मारल्या तरी गुडघ्याच्या स्नायुंना व्यायाम मिळण्यास मदत होते.
- २. टाचांवर २ फेऱ्या माराव्यात. सुरुवातीला बॅलन्स करणे अवघड जाईल, पण नंतर हळूहळू जमायला लागेल. एरवी आपण असे चालत नाही. पण गुडघ्याच्या स्नायुंना आराम मिळण्यासाठी मात्र हा व्यायाम अतिशय गरजेचा ठरतो.
- ३. पाय गुडघ्यातून वाकवून त्याचा काटकोन करायचा. गुडघ्याच्या खालील मांडीचा भाग दोन्ही हाताने धरायचा. आणि मग पाय गुडघ्यातून एकदा काटकोनात आणायचा आणि एकदा सरळ करायचा. असे किमान २० वेळा केल्यास वाटीतील वंगण सुरळीत होण्यास मदत होते.
हे वाचलंत का ?
- 33/11 केव्ही क्षमतेचा उपकेंद्राचे शिरसमणी येथे आमदार मा.अमोलदादा पाटील यांच्या शुभहस्ते भुमीपुजन….
- चाळीसगाव तालुक्यात वीज पडून तिघांचा मृत्यू, एकजण जखमी.
- एरंडोल चे माजी नगराध्यक्ष अपघातात गंभीर जखमी; माजी नगरसेविका पत्नी कल्पना महाजन यांनी केली घातपात असल्याची तक्रार.
- जिल्ह्यात गावठी कट्टे विकणाऱ्यां दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी केले जेरबंद; 1 लाख 70 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त.
- 60 वर्षीय व्यक्तीने विधवा महिलेवर केला बलात्कार, नराधमास धडा शिकविण्यासाठी लैंगिक अत्याचार झालेल्या अनेक महिलांनी आरोपीस जिवंत जाळले