जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.
मेष :-
आपली छाप पाडण्यात यशस्वी व्हाल. दिवस मनाजोगा व्यतीत कराल. घरातील लोकांचे उत्तम सहकार्य मिळेल. वरिष्ठांची मर्जी संपादन करावी. कमिशन मधून कमाई कराल.
वृषभ :-
मानसिक चंचलता जाणवेल. मनातील नसत्या चिंता काढून टाकाव्यात. जोडीदाराची बाजू जाणून घ्यावी. मौल्यवान वस्तु खरेदी कराल. घरात अधिकारी व्यक्तींची ऊठबस होईल.
मिथुन :-
जोडीदाराविषयी मनातील शंका दूर साराव्यात. भागीदारीत सलोख्याचे वातावरण ठेवावे. उत्तम व्यावसायिक लाभ संभवतो. अवास्तव अपेक्षा मनात बाळगू नका. मतभेदापासून दूर रहा.
कर्क :-
कामात चंचलता आड आणू नका. कामाच्या पद्धतीत वारंवार बदल करू नका. परोपकाराची जाणीव ठेवावी. नातेवाईकांना सढळ हाताने मदत कराल. हाताखालील लोकांची उत्तम साथ मिळेल.
सिंह :-
कामानिमित्त प्रवास करावा लागेल. विलंबावर मात करावी. मुलांच्या आनंदात सहभागी व्हाल. कामाची अचूक दखल घेतली जाईल. बौद्धिक छंद जोपासाल.
कन्या :-
अचानक धनलाभ संभवतो. एकाचवेळी अनेक कामे अंगावर घेऊ नका. छुप्या शत्रूंवर विजय मिळवता येईल. विरोधकांची तोंडे बंद होतील मुलांचे साहस वाढेल.
तूळ :-
उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. प्रेम सौख्यात वाढ होईल. भागिदारीतून चांगला लाभ होईल. बौद्धिक ताण जाणवेल. घरातील ज्येष्ठांची काळजी घ्यावी.
वृश्चिक :-
बोलतांना भान राखावे. कौटुंबिक जबाबदारी वाढीस लागेल. खर्चाला आवर घालावी लागेल. पराक्रमाला चांगला वाव मिळेल. मित्रांचा गोतावळा जमवाल.
धनू :-
जास्त चौकसपणा दाखवाल. प्रगतीला योग्य दिशा मिळेल. हातून चांगले लिखाण होईल. सरकारी कामे वेळेत पूर्ण करता येतील. काही गोष्टींचा पुनर्विचार करावा.
मकर :-
जुन्या गोष्टी उगाळत बसू नका. चिकाटी सोडून चालणार नाही. जबाबदारी योग्यप्रकारे हाताळावी. धाडसी शब्द वापराल. अति चिकित्सा करू नका.
कुंभ :-
स्पष्ट बोलण्यावर भर द्याल. गोष्टी चटकन लक्षात घ्याल. धूर्तपणे वागण्याकडे कल राहील. फार हट्टीपणा करू नका. कामात तत्परता दाखवावी.
मीन :-
उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. कागदपत्रांची योग्य छानणी करावी. जामीनकीच्या व्यवहारात सावधानता बाळगावी. गूढ गोष्टींकडे ओढ वाढेल. प्रवासाची आवड पूर्ण होईल.
हेही वाचलंत का ?
- Viral Video : सोशल मीडियावर रीलसाठी एका तरुणीच्या मूर्खपणा; भररेल्वेस्थानकात असे केले कृत्य लोकांना आला संताप, पहा व्हिडिओ
- शिपायाने दोघांच्या सोबतीने 7 वेळा विषारी इंजेक्शन देऊन केली पत्नीची हत्या; हत्येचे कारण ऐकून पोलीसही झालेत सुन्न.
- 30 हून अधिक विद्यार्थीनींचे लैंगिक शोषण करून 59 अश्लील व्हिडीओ केलेत पॉर्न साईटवर पोस्ट प्राध्यापकांचे घृणास्पद कृत्य, निनावी पत्रानं प्रकरण उघडकीस.
- भुसावळ तालुक्यात दारूच्या नशेत पतीने केली पत्नीची हत्या,संशयित आरोपी पती फरार.
- चेन्नई सुपर किंग्सचा मुंबई इंडियन्सवर ४ विकेट्सनी दणदणीत विजय!