Virel Video याला म्हणतात ‘जुगाड’, रिक्षापासून बनवली व्हिंटेज कार ? हर्ष गोयंकानी ट्विटरवर शेअर केलेला व्हिडिओ व्हायरल

Spread the love

Virel Video :- उद्योगपती हर्ष गोयंका यांनी नुकताच एक वेगळाच व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ बघून लोकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. या व्हिडिओ क्लिपमध्ये (Viral Video) एक ऑटोरिक्षा वेगळ्या अवतारात दिसत आहे. RPG चे चेअरमन हर्ष गोयंका (Harsh Goenka) नेहमी ट्विटरवर चांगली माहिती शेअर करत असतात. त्यांचे ट्विट सोशल मीडियावर व्हायरलदेखील होत असतात. उद्योगपती हर्ष गोयंका यांनी नुकताच एक वेगळाच व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ बघून लोकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

या व्हिडिओ क्लिपमध्ये (Viral Video) एक ऑटोरिक्षा वेगळ्या अवतारात दिसत आहे. एखाद्या लक्झरी कारप्रमाणे या रिक्षाला मॉडिफाय करण्यात आलं आहे. या देशी जुगाडाची (Desi Jugaad Video) इंटरनेटवर जोरदार चर्चा सुरु आहे. ज्याने ही कार बनवली आहे त्याने खरोखर कमाल केली आहे. एकदातरी या गाडीतून प्रवास करायला हवा, असं काहींचं म्हणणं आहे.हा व्हिडिओ 58 सेकंदांचा आहे. यात एक ऑटोरिक्षा दिसतेय जी इतर रिक्षांपेक्षा खूप वेगळी आहे. ही गाडी खास पद्धतीने डिझाईन करण्यात आली असून याच्या मागच्या भागामध्ये एक्स्ट्रा सीट जोडण्यात आली आहे.

ही गाडी पूर्णपणे वरून ओपन आहे. सीट एकदम आलिशान आहे.लोक या गाडीचे फोटो काढतायत तर काहीजण व्हिडिओ बनवतायत.खरंतर हा व्हिडिओ Avishkar Naik नावाच्या ट्विटर युजरने पोस्ट केला होता. हर्ष गोयंकांनी रिट्विट करत लिहिलं की,

जर विजय मल्ल्याला कमी खर्चामध्ये एक तीन चाकी टॅक्सी डिझाईन करायची असती तर ती अशी असती.. हा व्हिडिओला आत्तापर्यंत 18 हजारपेक्षा जास्त व्ह्यूज आणि खूप लाईक्स मिळाले आहेत. शेकडो युजर्सनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. काहींनी याला अमृत वाहन म्हटलं आहे. तर काहींनी सलमानच्या रेडी फिल्मची बाईक म्हटलं आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार