व्यक्तिमत्त्व विकासात सांस्कृतिक विकास मोलाचा ; सौ.रागिणी चव्हाण.
धरणगाव प्रतिनिधी / सतिष शिंदे सर
धरणगाव : तालुक्यातील पिंप्री खु.येथील वेदमाता गायत्री बहु. संचलित प्रोग्रेसिव्ह इंग्लिश स्कूल, आदर्श बालक विद्यामंदिर, प्राथमिक व माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने यशोदिप सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज व अफजलखान यांचे प्रताप गडावरील प्रसंग ,संस्मरणीय देखावा, स्वराज्याचा सुवर्ण क्षणाने कार्यक्रमाची सुरूवात झाली. तद्नंतर भारतीय संस्कृती, देशभक्ती, वारकरी संप्रदाय, देशाच्या समस्या, आदिवासी परंपरा, अहिराणी भाषा संवर्धन, शिक्षणाचे महत्त्व, लावणी , इमोशनल सीन, पारंपरिक लोकनृत्य, पथनाट्य, मराठी रिमिक्स, लावणी, वेस्टर्न डान्स, आदी विविधरंगी बहारदार परफॉर्मन्सच्या माध्यमातून विद्यार्थांनी उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उप शिक्षणाधिकारी सौ.रागिणी चव्हाण, तर प्रमुख अतिथी म्हणून धरणगावचे गट शिक्षणाधिकारी नरेंद्र चौधरी, चोपडा गटशिक्षणाधिकारी डॉ.भावना भोसले, कक्षा अधिकारी किशोर वानखेडे पंकज विद्यालय चोपडा मुख्याध्यापक एम व्ही पाटील, वेदमाता गायत्री बहु. संस्थाध्यक्ष मधुकर चौधरी, उपाध्यक्ष प्रमोद चौधरी, सचिव विनोद चौधरी, सौ.यशोदा चौधरी व संचालक होते. त्याचप्रमाणे गुणवंत विद्यार्थ्यांचा महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम प्रा. हेमंत पाटील, ॲड. गजानन पाटील, ज्ञानेश्वर भालेराव, पंढरीनाथ पाटील, ज्ञानेश्र्वर माळी, राजेंद्र पाटील, शरद पाटील, निता पाटील, उज्वल पाटील, प्रशांत पाटील, धरणगाव अधिकृत पत्रकार संघ तालुकाध्यक्ष राजेंद्र वाघ, शहराध्यक्ष विनोद रोकडे, लक्ष्मणराव पाटील, बी आर महाजन, कल्पेश महाजन, धीरज पाटील, ज्ञानेश्वर पाटील, निलेश पवार , विकास पाटील ,आदी मान्यवरांच्या हस्ते प्राविण्य प्राप्त व गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना सतिष शिंदे यांनी कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली तसेच आलेल्या अतिथी गणांचा परिचय करून स्वागत व ऋण व्यक्त केले.
कार्यक्रमाची सुरवात अतिशय मंगलमय वातावरणात दीपप्रज्वलनाने झाली. तद्नंतर भारतीय संस्कृतीप्रमाणे आलेल्या सर्व अतिथींचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
शाळेचे सचिव विनोद चौधरी यांनी आपल्या मनोगतातून कार्यक्रमाच्या आयोजनात सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अतिशय परिश्रम घेतले त्याबद्दल सर्वांचे तोंडभरून कौतुक केले. उपस्थित मान्यवरांनी कार्यक्रमाला सदिच्छा व्यक्त केल्या.

प्रमुख मान्यवर धरणगाव गटशिक्षणाधिकारी नरेंद्र चौधरी यांनी आपल्या मनोगतात शिक्षणाची कास धरताना सर्वांगीण विकास घडवण्यासाठी असे कार्यक्रम सुप्त गुणांना वाव देतात. शाळेचा प्रगतीचा आलेख उंचावर नेण्यासाठी केलेल्या अप्रतिम नियोजन बद्दल कौतुकास्पद शुभेच्छा दिल्या . “व्यक्तिमत्त्व विकासात सांस्कृतिक विकास अतिशय मोलाचा असतो”, असे प्रतिपादन सॊ रागिणी चव्हाण माध्यमिक उपशिक्षणाधिकारी यांनी व्यक्त केले. औपचारिक उदघाटन समारंभ आटोपल्यावर सर्व मान्यवरांनी समोर बसून कार्यक्रमाला मनापासून दाद दिली.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सॊ वैशाली चौधरी , आर आर पावरा , यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकवृंदानी परिश्रम घेतले.
कार्यक्रम प्रसंगी विद्यार्थी, पालक, शिक्षकेतर कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अतिशय बहारदार शैलीत विलास पाटील , भावना भाट यांनी तर अतिशय गोड शब्दात आभार आर एस पाटील यांनी मानले.
हे वाचलंत का ?
- जळगावात एमआयडीसी पोलिसांनी अवैध दारूभट्ट्या केल्या उध्वस्त; 7 लाखांचा मुद्देमालासह 27 जण ताब्यात.
- आजचे राशी भविष्य बुधवार दि.१९ मार्च २०२५
- Viral Video: दोन महिला शिक्षिकांमध्ये आधी वाद मग एकमेकांचे कपडे फाडत, झिंज्या उपटत शाळेतल्या मुलांसमोर फ्री स्टाईल हाणामारी, पहा व्हिडिओ.
- खळबळजनक! आधी दोन्ही अल्पवयीन मुलांची हत्या करून आई-वडिलांनी संपविली जीवन यात्रा, मृत्यूआधीचं पत्र वाचून तुमचेही डोळे पाणावतील.
- औरंगजेबाची कबर हटविण्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक, एरंडोल प्रांताधिका-यांना दिले निवेदन.