अपचन, गॅसच्या त्रासापासून मिळेल सुटका, थंडीत रोज गुळ खा, मिळतील ‘हे’ ५ फायदे

Spread the love

Jaggery Benefits in Winter : हिवाळ्यात सांधेदुखीचा त्रास जाणवतो. त्यामुळे सर्व वयोगटातील लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. या वेदनांमुळे त्यांना कुठेही हलता येत नाही.

खाण्यापिण्याच्या चुकीच्यासवयी आणि खराब जीवनशैलीमुळे अनेकांना पोटाच्या त्रासाचा सामना करावा लागतो. जर तुम्हालाही असा त्रास जाणवत असेल तर गुळाचे सेवन करून तुम्ही तब्येत चांगली ठेवू शकता. (Jaggery Benefits in Winter) हिवाळ्यात गूळ खाल्ल्यानं पचनक्रिया व्यवस्थित राहते. आजारांपासूनही आराम मिळतो. डॉक्टरही अनेकदा साखरेऐवजी गुळाचा चहा पिण्याचा सल्ला देतात.

गूळ खाण्याचे फायदे. :

रक्ताची कमतरता दूर होते

ज्या लोकांच्या शरीरात रक्ताची कमतरता आहे. त्यांनी हिवाळ्यात गुळाचं सेवन करायला हवं. गुळाच्या सेवनानं शरीरातील हिमोग्लोबिनची कमतरता दूर होते. याशिवाय शरीरातील रक्ताची पातळीसुद्धा वाढते. गूळात फॉस्फरेस आणि कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असते यामुळे हाडं मजबूत राहण्यास मदत होते.

पिंपल्स कमी होतात :

तारूण्यात त्वचेवर पिंपल्स येणं खूप सामान्य आहे. पिंपल्सच्या माध्यमातून शरीरातील हानीकारक टॉक्सिन्स बाहेर येत असतात. यामुळे चेहऱ्याचं सौंदर्य कमी होतं. पिंपल्स कमी करण्यासाठी आहारात गुळाचा समावेश करा. गूळ खाल्ल्यानं चेहऱ्यावरील पिंपल्स, काळे डाग दूर होईल चेहरा ग्लोईंग दिसण्यास मदत होते.

पचनाचे विकार दूर होतात :

गुळात फायबर मुबलक प्रमाणात आढळते. जेवणानंतर गूळ खाल्ल्यास पोट तंदुरुस्त राहण्यास आणि पचनक्रिया मजबूत होण्यास मदत होते.

सर्दी, खोकल्यापासून आराम मिळतो :

थंडी पडली की ताप किंवा सर्दी, सर्दी याने सर्वांनाच त्रास होतो. पण जर तुम्ही गूळाचे नियमित सेवन केले तर तुम्ही ही समस्या बर्‍याच प्रमाणात टाळू शकता. वास्तविक, गुळाचा प्रभाव गरम असतो, त्यामुळे त्याचे सेवन शरीराला फायदेशीर ठरते. गुळासोबत काळी मिरी आणि आले यांचे सेवन केल्यास सर्दी दूर होण्यास बराच आराम मिळतो.

सांधेदुखीचा त्रास कमी होतो :

हिवाळ्यात सांधेदुखीचा त्रास जाणवतो. त्यामुळे सर्व वयोगटातील लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. या वेदनांमुळे त्यांना कुठेही हलता येत नाही आणि त्यांना संपूर्ण वेळ घरी घालवावा लागतो. या समस्येवर मात करण्यासाठी गूळ आणि आल्याचे सेवन करता येते. आले रोज गुळाच्या तुकड्यासोबत खाल्ल्याने सांधेदुखीपासून बऱ्याच अंशी आराम मिळतो.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार