पिंप्री येथील पुस्तक प्रकाशन सोहळ्यात प्रतिपादन.
धरणगाव प्रतिनिधीं / सतिष शिंदे सर
धरणगाव :- शिक्षकाचा जन्म लाभणे हे भाग्य असून शिक्षकांत कवित्व असणे हे मी अहोभाग्य मानतो व हे कवित्व समाजात आम्ही येणे यास मी परमभाग्य म्हणतो या तिन्ही भाग्यांचे धनी अनोरे विद्यालयाचे निवृत्त उपशिक्षक तथा कवी साहित्यिक व अहिराणी चित्रपटाचे कलाकार,लेखक, दिग्दर्शक अशोक चौधरी निश्चित आहेत असे भाव उद्गार एरंडोल येथील कवी, साहित्यिक प्राध्यापक वा.ना आंधळे यांनी पुस्तक प्रकाशन सोहळ्यात केले.
तालुक्यातील पिंप्री खुर्द येथे ५ फेब्रुवारी रोजी अशोक चौधरी यांचे माझा जीवन प्रवास या आत्मकथनपर पुस्तकाचे प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष आखील भारतीय समरसता मंचचे कार्यकारिणी सदस्य प्राध्यापक रमेश महाजन होते तर पुस्तक प्रकाशन सोहळा प्राध्यापक वा ना आंधळे यांच्या हस्ते झाले तर प्रमुख पाहुणे म्हणून जळगांव येथील प्राध्यापक डॉक्टर केसुर,अनोरे विद्यालयाचे चेअरमन रमेश महाजन, जळगांव येथील प्राध्यापक आर बी ठाकुर, अनोरे विद्यालयाचे मुख्याध्यापक एम एच चौधरी, चर्मकार महासंघाचे कार्याध्यक्ष भानुदास विसावे, भाजपा नेते पी सी पाटील, नगरसेवक कैलास माळी, जि प सदस्य गोपाल चौधरी सेवानिवृत्त मुख्याध्यापक पी यु पाटील, धुळे येथील कवी विश्राम बिरारी,मंगल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक दीपक चौधरी यांनी केले. यावेळी मान्यवर व प्रमुख पाहुण्यांचे बुके व शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तसेच अशोक चौधरी यांच्या आत्मकथा नावावर आधारित माझा जीवन प्रवास या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
उपस्थित मान्यवरांमध्ये भानुदास विसावे,प्रा.केसुर,आर बी ठाकरे, एम एच चौधरी, गोपाल चौधरी,पी यू. पाटील, विश्राम बिरारी, आदींनी मनोगतातून अशोक चौधरी यांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये मिळवलेल्या यशाचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक रमेश महाजन यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले अशोक चौधरी यांचे काम म्हणजे समाजासाठी एक आदर्श आहे मोलमजुरी करणारा व्यक्ती एक चांगला आदर्श कवी साहित्यिक बनू शकतो हे यांच्या पुस्तकावरनं आपल्याला कळतंय.
यावेळी पंचक्रोशीतील सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील अनेक नागरिक, महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन परमेश्वर रोकडे व बी आर महाजन यांनी केले तर आभार ललित चौधरी यांनी मानले.
हे वाचलंत का ?
- Viral Video : सोशल मीडियावर रीलसाठी एका तरुणीच्या मूर्खपणा; भररेल्वेस्थानकात असे केले कृत्य लोकांना आला संताप, पहा व्हिडिओ
- शिपायाने दोघांच्या सोबतीने 7 वेळा विषारी इंजेक्शन देऊन केली पत्नीची हत्या; हत्येचे कारण ऐकून पोलीसही झालेत सुन्न.
- 30 हून अधिक विद्यार्थीनींचे लैंगिक शोषण करून 59 अश्लील व्हिडीओ केलेत पॉर्न साईटवर पोस्ट प्राध्यापकांचे घृणास्पद कृत्य, निनावी पत्रानं प्रकरण उघडकीस.
- भुसावळ तालुक्यात दारूच्या नशेत पतीने केली पत्नीची हत्या,संशयित आरोपी पती फरार.
- चेन्नई सुपर किंग्सचा मुंबई इंडियन्सवर ४ विकेट्सनी दणदणीत विजय!