C.C.TV Video : चोरट्याने महिलेच्या गळ्यातून अशी ओढली सोनसाखळी, घटना कॅमेऱ्यात कैद

Spread the love

खारघर :- मध्ये दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी एका महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी ओढून पळ काढल्याची घटना घडली आहे.ही संपूर्ण घटना त्या परिसरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या प्रकरणी महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलीस चोरांचा शोध घेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, खारघरमधील विहार गेटजवळ सेक्टर चारमध्ये ही घटना घडली.

याठिकाणी बाईकवरून आलेल्या दोघांपैकी एकाने महिलेच्या गळ्यातील साखळी ओढली आणि दुसऱ्याने बाईक सुरु करून ठेवली होती. साखळी चोरल्यानंतर दोघेही दुचाकीवरून निघून गेले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये तुम्ही पाहू शकता भर रस्त्यात दोन महिला बोलत असताना एक जण तिथे दबा धरून बसतो आणि दुसरा बाईक सुरु करून ठेवतो.

त्यानंतर पहिला महिलेच्या गळ्यातील साखळी ओढून गाडीवर बसतो आणि दोघे तेथून पसार होतात.चोरट्यांनी चोरलेली साखळी जवळपास पावणे दोन तोळ्याची होती. या चोरीप्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे चोरांचा शोध घेत आहेत.

हे पण वाचा

टीम झुंजार