बुऱ्हाणपूर येथे श्री अश्वत्थामा शिव महापुराण कथेत लाखो भाविकांचा जनसागर

Spread the love

निंभोरा प्रतिनिधी / परमानंद शेलोडे.

बुऱ्हाणपूर (म. प्र.) :- येथे शिवचरित्र कथेत पूज्य पंडित प्रदीप जी मिश्रा महाराज यांनी सर्व भाविकांना सांगितले शिव महादेवावर रोज सर्वांनी सकाळी एक लोटाजल व बेलपत्र अर्पण करून मनोभावे आराधना केल्यास दुःख दारिद्रय नष्ट होऊन सर्वांना सुख समृद्धी, मनाला आनंद प्राप्त होऊ शकतो.परमेश्वराचे स्मरण व भक्ती करतांना मनात कपट न ठेवता कोणाचेही मन न दुखवता स्वच्छ मनाने भक्ती केल्यास फल प्राप्त होते.वास्तू दोषांचा नाश केवळ भक्तीने दूर होऊ शकतो.संत सामान्य नसतात, ते भक्ती आणि आध्यात्मनाने बलवान असतात.शिवपुराण कथा ऐकण्यासाठी मध्य प्रदेशातील तसेच महाराष्ट्र राज्यातून लाखोंभाविकांनी उपस्थिती दिली आणि देत आहेत. सुमारे दोनशे एकर जागेत कथा श्रवणासाठी अथांग जनसागर शांततेत एकाग्रता मध्ये भाविक शिवपुराण कथा श्रवण करीत आहेत.भाविकांमध्ये लाखो स्त्री, पुरुष, युवक, युवती, बालगोपाल, सहभागी होत आहेत.तिसऱ्या दिवशी भाविकांची संख्या सात ते आठ लाखावर पोहचली आहे. आयोजकांनी सावलीसाठी पंडाल वाढविले. भाविकांसाठी गाडी पार्किंग व्यवस्था केली आहे.


महाराष्ट्र राज्य परिवहन मार्फत विशेष बस व्यवस्था ही करण्यात आली आहे. तसेच पाणी, जेवण, फराळाची व्यवस्था विविध गावातून भाविकांनी केली.रेणुकादेवी कृषी उत्पन्न बाजार समितीत शिवपुराण कथा मंडपात भक्तिमय वातावरण आहे बऱ्हाणपुर जिल्हा मधून प्रत्येक गावातून दररोज कित्येक क्विंटल पोळ्या, भाकरी,फूड हॉलमध्ये पाठवल्या जात आहेत. भोजन शाळेत हजारो भाविकांना प्रसाद तयार करून वितरित केला जात आहे.शिवपुराण चरित्र कथा 9 फेब्रुवारी शुक्रवार पर्यन्त राहणार आहे.


माजी मंत्री अर्चना चिटणीस, महापौर माधुरी पटेल, अमित मिश्रा, अजयसिंग रघुवंशी,अतुल पटेल, अनिल भोसले, शिवपुराण समितीचे अध्यक्ष माधव बिहारी अग्रवाल, उद्योगपती संजय अग्रवाल, आदींनी श्रवणात सहकार्य करून सहभाग घेतला.पोलीस प्रशासन, सामाजिक, राजकीय कार्यकर्ते, भाविक मोठया प्रमाणात शिवकथा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सहकार्य करतांना दिसून आले. एकंदरीत बऱ्हाणपुर मध्ये भक्तांचा मळा फुललेला दिसून आला. सर्वत्र भक्तिमय वातावरण तयार झाले.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार