प्रतिनिधी निंभोरा / परमानंद शेलोडे
रावेर :- तांदलवाडी येथील ग्रामपंचायत कार्यालय आवारातील निंबाच्या उंच अश्या वृक्षावर पतंगाच्या दोरात एक सुंदर पक्षी अडकून धडपडत पत्रकार सुमित पाटील यांना त्यांचा घराच्या अंगणातुन दिसला त्यांनी लगेच गावातील ग्रामसेवक, पक्षी मित्र उदय चौधरी यांना बोलावून घेतले.त्यांनी सांगितले की हा शिक्रा जातीचा आहे. निंबाच्या उंच अश्या फांदीच्या टोकावर पतंगाच्या दोरावर पंखाला गाठ पडून सुटकेसाठी शिक्रा पक्षी धडपडत होता.

कावळे त्याला चोच मारून त्रास देत आवाज करीत होती.पक्षी फार उंच असल्याने ग्रा पं कार्यालयावर चढून ओम महाजन यांनी आणलेल्या एका पाईपास बांबू बांधून तारेचा हुक बांधला व पक्षी मित्राच्या साह्याने अलगद खाली उतरून पंखाला पडलेल्या दोराच्या गाठी ब्लेड ने अलगद कापून त्यास सोडून दिले. सुंदर दिसणाऱ्या शिक्रा जातीच्या पक्षाला जीवनदान दिले