धुळे : धुळे जिल्हा पोलिसांच्या वतीने ‘हिट धुळे फिट धुळे’ मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेमध्ये स्पर्धकांचा उत्साह वाढवण्यासाठी झुम्बा डान्सचे देखील आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, यावेळी भाजपचे संकटमोचक नेते म्हणून ओळखले जाणारे गिरीश महाजन यांचा नवीन अंदाज पाहायला मिळाला.
गिरीश महाजन यांचा आपल्या खास अंदाजमध्ये भन्नाट झुम्बा डान्स पाहायला मिळाला. त्यांनी केलेल्या या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणत व्हायरल झाला आहे.
पहा व्हिडिओ :
या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, कशा प्रकारे गिरीश महाजन हे मोठ्या उत्साहाने डान्स करत आहे. या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये अनेक तरुणांनी आणि नागरिकांनी सहभाग घेतला होता. तर पालकमंत्र्यांच्या उपस्थितीमुळे नागरिकांमध्येही उत्साह पाहायला मिळाला.
हे वाचलंत का ?
- एरंडोल बसस्थानकावर सर्वत्र घाणीचे साम्राज्य; आगार व्यवस्थापकांचे बस स्थानकाच्या स्वच्छतेकडे पूर्णपणे दुर्लक्ष.
- पाऊले चालती पंढरीची वाट-चांदसर पायीदिंडीचे एरंडोलला स्वागत स्व. जयवीरबापू पाटील स्मृतीप्रित्यर्थ -गटसचिव संघटना 18 वर्षांपासून करीत आहे अन्नदान.
- “पैसेही गेले आणि बायकोही गेली पुन्हा मी एकटाच”… तीन लाख देऊन आणलेली बायको निघाली एका मुलीची आई; दोन दिवसांत टोळीचा भांडाफोड.
- मेट्रो स्टेशनखाली वडिलांजवळ झोपलेल्या अडीच वर्षांच्या चिमुकल्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधम आरोपीचा एन्काउंटर .VIDEO
- तरुणाचे एकीशी प्रेमसंबंध, तिचं दुसऱ्याशी लग्न ठरलं, तरुण गेला जाब विचारण्यास , तेथे झाला वाद पळून घरी येताना तरूणाचा खून करून तो अपघात असल्याचा केला बनाव.