जि. प. शाळा निंभोरा स्टेशन येथे माता रमाई आंबेडकर यांची १२५ वी जयंती उत्साहात साजरी

Spread the love

निंभोरा प्रतिनिधी / परमानंद शेलोडे

रावेर :- जि.प शाळा निंभोरा स्टेशन, येथे माता रमाई आंबेडकर यांची १२५ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात येऊन सर्व मान्यवरानी अभिवादन केले.


याप्रसंगी युवा कार्यकर्ते अक्षय तायडे यांनी त्रिशरण पंचशील घेतले. यानंतर माता रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेस शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिलीप खैरे यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.

तर मुख्याध्यापक आणि शिक्षक वृंद, रेखाबाई महाले, संगीता बिऱ्हाडे तसेच पंकज तायडे, हेमंत महाले, दुर्गेश करवले, अमर मेढे ऋषिकेश तायडे चंद्रकांत कुहे, आर्यन अटकाळे ,प्रणव शिरसाट, आकाश तायडे , प्रधुन्य कुऱ्हे अभय अटकाळे यांचे हस्ते पुष्पपूजा,धूपपूजा व दिपपूजा करण्यात आले. यावेळी शालेय विद्यार्थी,विद्यार्थ्यांनी सोबत मोठ्या संख्येने महिलाही उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक विशाल सोनवणे यांनी तर कार्यक्रमाचे आभार मुख्याध्यापक माधुरी राणे यांनी मानले .

हे वाचलंत का ?

टीम झुंजार