एरंडोल :- दि. 7 फेब्रुवारी रोजी एरंडोल येथील श्रावस्ती पार्क येथे त्यागमूर्ती माता रमाई यांची 125 वी जयंती उत्साहात संपन्न झाली. रमाई महिला मंडळ तसेच ‘त्यागमूर्ती माता रमाई’ पुस्तकाच्या लेखिका वर्षा शिरसाठ यांच्या वतीने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पूज्य भंते गुणरत्न महाथेरो, मंडळ अधिकारी संजय साळुंखे, सेवानिवृत्त मुख्याध्यापिका उषाकिरण खैरनार यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉक्टर अशोक सैंदाणे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई यांच्या प्रतिमांना प्रभाबाई महाजन यांचे हस्ते माल्यार्पण करण्यात आले. पूज्य भन्ते गुणरत्न महाथेरो यांनी उपस्थितांना त्रिसरण व पंचशील दिले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक बौद्ध साहित्य प्रसार संस्थेचे प्रदेश सचिव प्रा. भारत शिरसाठ यांनी केले. कार्यक्रम प्रसंगी उषाकिरण खैरनार, वर्षा शिरसाठ, ज्योती गजरे, प्रमिला तामस्वरे, नेहा खैरनार, निशू तामस्वरे व मनोज नन्नवरे सर यांनी गीत गायन सादर केले. याप्रसंगी उपस्थित महिलांना वर्षा शिरसाठ लिखित ‘त्यागमूर्ती माता रमाई’ पुस्तकाचे वितरण करण्यात आले. प्राध्यापक नरेंद्र तायडे यांना डाॅक्टरेट पदवी प्राप्त झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी रघुनाथ सपकाळे, चिंतामण जाधव, प्राध्यापक डॉक्टर नरेंद्र तायडे, प्राध्यापक गाढे, मनोज नन्नवरे, सुभाष अमृतसागर, भगवान ब्रह्मे, निंबा खैरनार, एडवोकेट सिद्धार्थ साळुंखे, मुकेश ब्राह्मणे, शुभम तामस्वरे, डॉक्टर शुभम जाधव, डॉक्टर भूषण जाधव, ॲड दिपक सपकाळे, निशांत खोब्रागडे, गौतम केदार, प्रशांत खोब्रागडे, गौतम सोनवणे, लखन बनसोडे, अभिषेक खैरनार, यश सोनवणे, सत्यम रामोशी, सुलोचना खोब्रागडे, मनीषा जाधव, प्रमिला तामस्वरे, विमलबाई रामोशी, वर्षा लोखंडे, मिराबाई सपकाळे, कमलताई बाविस्कर, निशू तामस्वरे, मीना ब्रम्हे, जयश्री अमृतसागर, वर्षा लोखंडे, शीतल साळुंखे, अलका खैरनार, वर्षा कोतकर, रमा ब्राह्मणे, ज्योती रामोशी, शोभा बनसोडे, अर्चना बनसोडे, वर्षा बनसोडे, मनिषा मोरे, कमल पवार, वर्षा तामस्वरे, सुरेखा सोनवणे, तसेच मोठ्या प्रमाणावर एरंडोल शहरातील पुरूष व महीला कार्यक्रमाला उपस्थित होते.
हे वाचलंत का ?
- आजचे राशी भविष्य बुधवार दि.१९ मार्च २०२५
- Viral Video: दोन महिला शिक्षिकांमध्ये आधी वाद मग एकमेकांचे कपडे फाडत, झिंज्या उपटत शाळेतल्या मुलांसमोर फ्री स्टाईल हाणामारी, पहा व्हिडिओ.
- खळबळजनक! आधी दोन्ही अल्पवयीन मुलांची हत्या करून आई-वडिलांनी संपविली जीवन यात्रा, मृत्यूआधीचं पत्र वाचून तुमचेही डोळे पाणावतील.
- औरंगजेबाची कबर हटविण्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक, एरंडोल प्रांताधिका-यांना दिले निवेदन.
- महिलेच्या पर्समधील ७ लाख ८० रुपये किमतीचे सोने चोरणाऱ्या दोघं महिलाना अमळनेर पोलिसांनी केली अटक.