कोल्हापूर : – कोल्हापूरात काल एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. काल संध्याकाळी साधारण साडेपाचच्या सुमारास एका ९ महिन्यांच्या चिमुकल्याचा गव्हाच्या पिठाच्या भांड्यात तोल गेल्याने त्याचा मृत्यू झाला. राज्यात ह्रदय पिळवटून टाकणारी एका घटना समोर आलीय. घरात ठेवलेल्या पिठाच्या भांड्यावर पडल्याने नाका तोंडात पिठ गेल्याने गुदमरून 9 महिन्याचा चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. कृष्णराज राजाराम यमगर (वय ९ महिने, रा.जुना वाशीनाका) असे या चिमुकल्याचे नाव असून ही घटना कोल्हापुरातील करवीर तालुक्याच्या वडणगे गावात घडलीय. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापुरातील जुना वाशीनाका येथे राहणाऱ्या सुप्रीया राजाराम यमगर या आपला लहान मुलगा घेऊन वडणगे येथे आजीकडे आल्या होत्या. दरम्यान, काल संध्याकाळच्या सुमारास कृष्णराज वॉकरमधून खेळत होता. मात्र, चालता-चालता त्याचा गव्हाच्या पिठाच्या भांड्यात तोल गेला आणि तो त्यात पडला. भांड्यामध्ये पीठ मोठ्या प्रमाणात असल्याने कृष्णराजच्या तोंडात आणि नाकात गव्हाचे पीठ गेले आणि ते पीठ त्याच्या नाका-तोंडात चिकटून बसले.
दरम्यान, आजीने त्याला त्वरित त्या भांड्यातून बाहेर काढले आणि नाका तोंडात पीट गेल्याचे लक्षात येताच त्याला कुटुंबीयांनी तत्काळ रुग्णालयात दाखल केले.त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. दरम्यान ही बाब घरच्यांना समजताच रुग्णालय परिसरातच नातेवाईकांनी हंबरडा फोडला. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
हे वाचलंत का ?
- Viral Video : सोशल मीडियावर रीलसाठी एका तरुणीच्या मूर्खपणा; भररेल्वेस्थानकात असे केले कृत्य लोकांना आला संताप, पहा व्हिडिओ
- शिपायाने दोघांच्या सोबतीने 7 वेळा विषारी इंजेक्शन देऊन केली पत्नीची हत्या; हत्येचे कारण ऐकून पोलीसही झालेत सुन्न.
- 30 हून अधिक विद्यार्थीनींचे लैंगिक शोषण करून 59 अश्लील व्हिडीओ केलेत पॉर्न साईटवर पोस्ट प्राध्यापकांचे घृणास्पद कृत्य, निनावी पत्रानं प्रकरण उघडकीस.
- भुसावळ तालुक्यात दारूच्या नशेत पतीने केली पत्नीची हत्या,संशयित आरोपी पती फरार.
- चेन्नई सुपर किंग्सचा मुंबई इंडियन्सवर ४ विकेट्सनी दणदणीत विजय!