मंत्री गिरीश महाजन यांच्या वैद्यकीय मदतीने दिव्यांग गणेश माळीला मिळणार हक्काचे दोनही हात

Spread the love

निंभोरा प्रतिनिधी / परमानंद शेलोडे

शहादा :- तालुक्यातील असलोद येथील आठ वर्षीय बालक गणेश अनिल माळी या बालकाला आज वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्या वैद्यकीय मदतीने ग्रामीण भागातील एका गरीब कुटुंबातील मुलाला हक्काचे दोनही हात मिळणार आहेत.या बालकाला दोन्ही हात मिळणार असल्याने माळी परिवाराला आकाश ठेंगणे झाले. पंचक्रोशीतील नागरिक मंत्री गिरीश महाजन यांच्या या सेवेबद्दल मनःपूर्वक धन्यवाद देत आहेत.

झाले असे की,एक दिवस एका कार्यकर्त्यांनी दिव्यांग बालक गणेश माळी यांच्या विषयी मोबाईल फोनवर मंत्री गिरीश महाजन यांना मेसेज करून माहिती दिली व त्यांनी त्यांची तात्काळ दखल घेत या बालकाला आपल्या शासकीय निवासस्थानी बोलावून घेतले.
त्यांच्या वडिलांकडे आस्थेने चौकशी केली. लवकरच गणेश माळी या बालकांवर मुंबईतील सुप्रसिद्ध ग्लोबल हॉस्पिटल मधील प्रमुख डॉक्टरांशी दुरध्वनी व्दारे चर्चा करून उपचारासाठी लगेचच मदत करण्याचे आदेश मंत्रीमहोदयांनी यावेळी दिले.त्यांनी या बालकाच्या बाबतीत आपण सर्वतोपरी मदत करणार आहोत असे आश्वासन यावेळी गणेश चे पालक श्री. अनिल माळी यांना दिले. तसेच वैयक्तिक लक्ष देणार असल्याचेही श्री महाजन यांनी सांगितले.

या बालकाचा संघर्ष निश्चित प्रेरणादायी स्वरुपाचा असून तो दोन्ही हात नसतानां सुध्दा आपल्या पायच्या सहायाने आपली स्वत: ची सर्व कामे स्वत: करतो. दिव्यांगावर मात करुन जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता दुसरीमध्ये शिकणारा गणेश पायाने शाळेत अक्षरे गिरवतो .
गणेश चे वडील अनिल माळी हे घरची परिस्थिती हालाखीची असल्याने दररोज रोजंदारीवर दुसऱ्याच्या शेतावर कामाला जातात तर आई लहान असताना सोडून गेली आहे.आशा परिस्थिती शाळेत हुशार असलेल्या गणेश ला वैद्यकीय मदतीची गरज होती ती आता मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रयत्नामुळे पुर्ण होणार असून भविष्यातील आपली स्वतःची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी गणेशला एक हक्काची मदत होणार आहे.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार