एरंडोल पारोळा मतदारसंघात प्रथमच सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौरा,उपकाराची परतफेड करण्याची सुवर्णसंधी आ.चिमणराव पाटील

Spread the love

एरंडोल :- मतदारसंघात प्रथमच मुख्यमंत्र्यांचा दौरा होत असून मुख्यमंत्र्यी एकनाथराव शिंदे यांनी मतदारसंघावर प्रचंड प्रमाणात निधी दिला असून त्या उपकाराची परतफेड करण्याची सुवर्णसंधी असून सदर हा दौरा यशस्वी करण्याचे आवाहन आमदार चिमणराव पाटील यांनी केले शासकीय विश्रामगृहावर पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना आमदार चिमणराव पाटील म्हणाले स्वातंत्र्यानंतरच एरंडोल पारोळा मतदारसंघात प्रथमच मुख्यमंत्री यांच्या दौरा होत आहे नामदार एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री झाल्या मुळेच

मतदारसंघाला माझ्या प्रयत्नांमुळे व मी त्यांच्या सोबत जाण्याच्या निर्णयामुळे एवढा मोठा निधी उपलब्ध झाला आहे त्याची परतफेड करण्याची संधीआता मिळाली असूनजास्तीत जास्त संख्येने पारोळा येथे होणाऱ्या 13 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मेळाव्यातआपली उपस्थिती देऊन दौरा यशस्वी करण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना केला मतदारसंघाचा कायापालट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे होत असून आपण घेतलेला निर्णय हा योग्य असल्याचे आता पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थिती वरून दिसून येत आहे.

नवी

असेही ते म्हणाले आपला मतदारसंघ हा ऊर्जा देणारा व शक्ती देणारा मतदारसंघ असून याचे उत्तम उदाहरण आपण 13 फेब्रुवारी देऊया असे आवर्जून सागितले व कार्यकर्त्यांना आवाहन केले सदर बैठकीत देशमुख राठोड यांनी बाळासाहेब शिवसेनेत प्रवेश केल्याने आमदार चिमणराव पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.जिल्हा बँकेचे संचालक व युवा नेतेअमोल चिमणराव पाटील यांनी मतदारसंघातील युवकांचे व पदाधिकाऱ्यांचे खास करून कौतुक केले

मुख्यमंत्र्यांच्या दौराला कोणत्याही प्रकारची कमी न राहता सर्व परीने दौरा यशस्वी करण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आजची उपस्थिती दिली यावरून आधार निश्चितच यशस्वी होईलअसे विश्वास दिले सदर बैठकीत बाजार समितीचे माजी सभापती शालिग्राम गायकवाड जिल्हा शिवसेनाप्रमुख वासुदेव पाटील माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी तालुका युवासेना प्रमुख बबलू पाटील शहरप्रमुख आनंदा चौधरी, जावेद मुजावर, सुदाम राक्षे, विठ्ठल आंधळे, देविदास चौधरी, किरण पाटील यांनी मार्गदर्शन केले

सूत्रसंचालन तालुकाप्रमुख रवींद्र जाधव तर आभार मयूर महाजन यांनी मानले.यावेळी दूध संघाचे संचालक दगडु चौधरी, कासोदा सरपंच महेश पांडे, मनोहर पाटील, डॉ. दिनकर पाटील, गबाजी पाटील, संजय चौधरी,मोहन सोनवणे, संभाजी पाटील,मुकुंदा पाटील, शरद ठाकूर, कृष्णा ओतारी,गुड्डू जोहरी, संजय पाटील,परविन देशमुख, राजू बडगुजर, मुकुंदा पाटील, बाळासाहेब पाटील, शरद पाटील, ईश्वर कोळी, अशोक पाटील, श्याम बडगुजर, अजयराजे बाविस्कर,समाधान पाटील, बाळासाहेब पाटील,गोविंद राठोड यांच्यासह असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

हे पण वाचा

टीम झुंजार