एरंडोल :- तालुक्यातील पिंपळकोठा प्र.चा येथे दिनांक 26 जानेवारी रोजी रद्द झालेली ग्रामसभा दि.7फेब्रुवारी रोजी घेण्यात आली. मात्र पाणी प्रश्नावरून सत्ताधारी व विरोधक यांच्यात एकच गोंधळ झाल्यामुळे सर्वच विषयांना बगल देत ग्रामसभा गुंडाळण्यात आली. ग्रामसभेला सुरुवात झाल्यावर ग्रामस्थांनी विविध विषय ग्रामसभेच्या समोर मांडले. त्यातील प्रमुख मुद्दा म्हणजे गावात तब्बल एक कोटी रुपये खर्चाची कढोली येथून चार किलोमीटर अंतराची पाणी योजना गतवर्षी करण्यात आली. योजनेचे उद्घाटन होऊन आठ महिने उलटले तरी गावात पाणी का पोहोचले नाही.
असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला. आजही गावात जुन्या पाणीपुरवठा योजनेतून पाणीपुरवठा केला जातो. सहा गावात सहा दिवसात पाणीपुरवठा सुरू असून भर हिवाळ्यात जर पाहण्यासाठी ताटकळत राहावे लागते. तर उन्हाळ्यात कसे होणार. सदर योजनेचे विद्युत ट्रांसफार्मर न बसवल्यामुळे योजना कार्यान्वित झाली नसल्याचे ग्रा प प्रशासनाकडून सांगण्यात आले. योजना पूर्ण झाली नव्हती तर अपूर्ण योजना ग्राहकाने ठेकेदाराकडून ताब्यात का घेतली?

भर पावसाळ्यात तातडीने पाणीपुरवठा योजनेचे उद्घाटन का करण्यात आले? ऑनलाइनच्या आराखड्यात विविध काम टाकण्यात आलेली आहेत. ते का पूर्ण करण्यात आले नाहीत? असे एक ना अनेक प्रश्न ग्रामसभेत उपस्थित झाले. सत्ताधारी व विरोधक यांच्यात या प्रश्नावरून जुंपली. आणि ग्रामसभेत एकच गोंधळ उडाला. आणि ग्रामसभा आवरण्यात आली. चार महिन्यातून ग्रामसभा बोलावण्यात येते. ग्रामसभेतच ग्रामस्थांना त्यांचे प्रश्न मांडण्याची संधी मिळते.

अशावेळी जाणून-बुजून ग्रामसभा गुंडाळण्यात आली असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.गावात नुकतीच ग्रा.प. निवडणूक पार पडली असून त्यानंतरची ही पहिली ग्रामसभा होती. त्यामुळे ही ग्रामसभा वादग्रस्त ठरण्याची शक्यता सत्ताधाऱ्यांना होती. तर त्यांनी पोलीस बंदोबस्त का मागवला नाही असे प्रश्न आता ग्रामस्थांनी उपस्थित केले आहेत. ग्रामसभेत सरपंच गिताबाई पाटील. व ग्रामसेवक गिरीश चव्हाण. ग्राफर सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हे पण वाचा
- आजचे राशी भविष्य बुधवार दि.१९ मार्च २०२५
- Viral Video: दोन महिला शिक्षिकांमध्ये आधी वाद मग एकमेकांचे कपडे फाडत, झिंज्या उपटत शाळेतल्या मुलांसमोर फ्री स्टाईल हाणामारी, पहा व्हिडिओ.
- खळबळजनक! आधी दोन्ही अल्पवयीन मुलांची हत्या करून आई-वडिलांनी संपविली जीवन यात्रा, मृत्यूआधीचं पत्र वाचून तुमचेही डोळे पाणावतील.
- औरंगजेबाची कबर हटविण्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक, एरंडोल प्रांताधिका-यांना दिले निवेदन.
- महिलेच्या पर्समधील ७ लाख ८० रुपये किमतीचे सोने चोरणाऱ्या दोघं महिलाना अमळनेर पोलिसांनी केली अटक.