भडगाव (प्रतिनिधी) – कर्मवीर तात्यासाहेब हरि रावजी पाटील,किसान शिक्षण संस्था,भडगाव,संचलीत,गोपीचंद पुना पाटील,विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,कोळगाव ता.भडगाव येथील इयत्ता अकरावी कला शाखेची विद्यार्थीनी तथा पैलवान कु.पायल सोनवणे हिने १७ वर्षाआतील मुलींच्या ४६ किलो वजनी गटात क्रीडा व युवक सेवा संचालनालय तथा धुळे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे,जिल्हा क्रीडा संकुल,धुळे येथे आयोजीत विभागस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत उपविजेतेपद प्राप्त केले आहे.
कु.पायल सोनवणे हिस आदर्श क्रीडा शिक्षक बी.डी.साळुंखे,प्रा.सतीश पाटील,राष्ट्रीय खो-खो पंच प्रा.प्रेमचंद चौधरी,सचिन काळे,श्रीमती प्रमिला काळे,कैलास सोनवणे,सुरेश पैलवान,गोरख पैलवान यांचे मार्गदर्शन लाभले.

पायलच्या या यशाबद्दल नाशिक विभागाच्या क्रीडा उपसंचालिका सुनंदा पाटील,संस्थेचे चेअरमन प्रतापराव पाटील,सचिव डॉ.पुनमताई पाटील,उपसचिव प्रशांतराव पाटील,माजी नगराध्यक्ष शामकांत पाटील,माध्यमिक सोसायटी संचालक जगदीश पाटील,प्राचार्य सुनिल पाटील,पर्यवेक्षक अनिल पवार,प्र.प्राचार्य संदीप बाविस्कर,क.म.कार्यवाहक रघुनाथ पाटील तसेच महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर बंधु-भगिनी यांनी अभिनंदन करुन पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
हे वाचलंत का ?.
- एरंडोल बसस्थानकावर सर्वत्र घाणीचे साम्राज्य; आगार व्यवस्थापकांचे बस स्थानकाच्या स्वच्छतेकडे पूर्णपणे दुर्लक्ष.
- पाऊले चालती पंढरीची वाट-चांदसर पायीदिंडीचे एरंडोलला स्वागत स्व. जयवीरबापू पाटील स्मृतीप्रित्यर्थ -गटसचिव संघटना 18 वर्षांपासून करीत आहे अन्नदान.
- “पैसेही गेले आणि बायकोही गेली पुन्हा मी एकटाच”… तीन लाख देऊन आणलेली बायको निघाली एका मुलीची आई; दोन दिवसांत टोळीचा भांडाफोड.
- मेट्रो स्टेशनखाली वडिलांजवळ झोपलेल्या अडीच वर्षांच्या चिमुकल्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधम आरोपीचा एन्काउंटर .VIDEO
- तरुणाचे एकीशी प्रेमसंबंध, तिचं दुसऱ्याशी लग्न ठरलं, तरुण गेला जाब विचारण्यास , तेथे झाला वाद पळून घरी येताना तरूणाचा खून करून तो अपघात असल्याचा केला बनाव.