निंभोरा येथे ४४ वर्षानंतर वर्गमित्र आले एकत्र

Spread the love

निंभोरा प्रतिनिधी / परमानंद शेलोडे

स्नेह मिलन भेटीगाठी मेळावा संपन्न ,
माजी विद्यार्थांनी ज्या वर्गात शिक्षणाचे धडे गिरवले त्याच वर्गात त्याच बाकावर बसून शिकवल्याचा ४४ वर्षानंतर घेतला आनंद …


१९७९ बॅचच्या वर्ग मित्र मैत्रिणींचा स्नेह_ संमेलन मेळावा
रावेर तालुक्यातील निंभोरा येथे दि 5/2/2023 रविवार रोजी न्यू इंग्लिश स्कूल व जुनिअर कॉलेजच्या माजी विद्यार्थी व विद्यार्थींनीचा स्नेहमिलन भेठी गाठी मेळावा आज साजरा झाला.विशेष म्हणजे हा मेळावा ४४ वर्षानंतर


दहावीच्या ७९ च्या बॅचमधील असणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनींचा झाला.सकाळी प्रथम विद्येची देवता सरस्वती मातेच्या फोटोला पुष्प अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.स्वागत गिताने सर्वांचे स्वागत करण्यात आले.भरपूर विद्यार्थी विद्यार्थिनी आता अनेक पदावर अनेक ठिकाणी शहरात बाहेर गेले आहेत तरीही ते कार्यक्रमाला उपस्थित होते. कोणी डॉक्टर , इंजिनिअर , व्यावसायिक व शेतकरी तर कोणी नोकरी जो तो आपले कार्य सोडून आज या स्नेह मेळाव्यात उपस्थित होते. सोशल मिडीया व्हाटसअप ग्रुपच्या माध्यमातुन सर्वांशी संपर्क साधुन या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.


या स्नेह मेळाव्यात परिचय , उखाणे , अंताक्षरी , गरभा , दांडीया असे विविध कार्यक्रम झाले. त्यानंतर स्नेहभोजनाची भरीत पुरीची पार्टी तर चांगलीच रंगली. गावातील शिक्षकांना ही आमंत्रित करण्यात आले होते.शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले , जसं ४४ वर्षा अगोदरचे प्रसंग आठवत तशा सर्वांमध्ये गप्पा ही रंगल्या होत्या व जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला. ज्या वर्गात शिक्षण घेतले त्याच वर्गात त्याच बाकावर बसुन भूतकाळात जाऊन रमबाण झाले हे सर्व न विसरण्यासारखे आहे.सर्वांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद दिसत होता. असा हा आगळा वेगळा सोहळा आनंदात पार पडला.मुले मुली मिळून किमान ८० जण उपस्थित होते. विद्यार्थ्यांतर्फे शिक्षकांचा सत्कार ही करण्यात आला. व दिवंगत मित्रांना श्रद्धांजली अर्पण केली.


या स्नेह मिळायचे आयोजन रविंद्र बोरनारे, गिरीश चौधरी,कैलास नेमाडे ,धनराज राणे, करीम टेलर, सुरेश चौधरी यांनी केले होते.तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व मित्र व मैत्रणींनी सहकार्य केले.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार