रेल्वेत नोकरीच्या बहाण्याने १७ लाखांत फसवणूक ; भडगांव पोलिसात गुन्हा दाखल.

Spread the love

भडगाव प्रतिनिधी :- रेल्वेत नोकरी लावून देण्याच्या
आमिषाने भडगाव शहरातील बाळद रोड भागातील तरुणाची 17 लाखात फसवणूक करण्यात आली. संशयीतांनी बनावट नियुक्तीपत्र दिल्याचा प्रकार समोर आला असून या प्रकरणी भडगाव पोलिसात पाच संशयीतां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर असे की
तक्रारदार रंगनाथ साहेबराव पाटील (बाळद रोड,भडगाव) यांच्या फिर्यादीनुसार संशयीत आरोपींनी त्यांचा मुलगा अक्षय पाटील यास रेल्वेत नोकरी
लावून देवू, असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला व वडजी, ता.भडगाव व नाशिक येथे 15 लाखांची रोकड 9 मे 2022 पूर्वी स्वीकारली होती तसेच नोकरी साठी नोटरी देखील करून दिली मात्र तक्रारदारास बनावट

नियुक्तीपत्र देण्यात आले व त्यावर खोटी अधिकाऱ्यांची स्वाक्षरी करण्यात आल्याची बाब उघडकीस आली आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पैशांची मागणी केली मात्र पैसे परत करण्यात न
आल्याने त्यांनी भडगाव पोलिसात तक्रार नोंदवली.
नोकरीसाठी दिलेले 15 लाख व झालेला अन्य दोन लाखांचा खर्च असे एकूण 17 लाखांची फसवणूक करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले
आहे.

याबाबत भडगांव पोलिस स्टेशनला फिर्यादी- रंगनाथ साहेबराव पाटील यांच्या फिर्यादी वरून संशयित आरोपी धनराज किसनराव हाके रा.कमाल वाडी ता.जि.लातुर,मुन्ना सोनिया कुवर रा.वारस ता.साक्री जि.धुळे, सुनिल बंडु मानकर,प्रतिभा बंडु मानकर रा.नाशिक,कदम पुर्ण नाव माहित नाही रा.मुंबई यांच्या विरोधात भडगांव पोलिसात गुन्हा.रं.जी नं 34/2023 भादवी कलम 420,406,464,465,409 व 120 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पुढील सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रसेन पालकर हे करीत आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार