विवाहितेचा विनयभंग करीत पतीसह मुलाला मारहाण तिघांविरोधात गुन्हा दाखल.

Spread the love

भडगांव प्रतिनिधी :–
संशयित आरोपीच्या मुलीला दुचाकीवर बसवल्याच्या रागातून तिघांनी महिलेचा विनयभंग करीत तिच्या पतीसह मुलाला बेदम मारहाण करीत जिवे ठार मारण्याची धमकी दिली. ही घटना भडगाव तालुक्यातील एका गावात 5 व 6 रोजी घडली. या प्रकरणी याप्रकरणी बुधवार, 9 फेब्रुवारी रोजी रात्री 11 वाजता तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

तिघांविरोधात गुन्हा दाखल

भडगाव तालुक्यातील एका गावातील 50 वर्षीय पिडीतेच्या तक्रारीनुसार त्यांचा मुलाने संशयित आरोपीच्या मुलीला दुचाकीवर बसवल्याचे वाईट वाटून आरोपींनी त्यांचे केस ओढून मारहाण करीत विनयभंग केला तसेच त्यांच्या मुलाला व पतीदेखील चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. 5 व 6 फेब्रुवारी रोजी हा प्रकार घडला. या प्रकरणी पीडीतेच्या तक्रारीवरून भडगाव पोलीस ठाण्यात सौरभ संभाजी थोरात, अनिल विक्रम थोरात आणि सुनील विक्रम थोरात या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार जिजाबराव पवार करीत आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार