बलात्काराच्या गुन्ह्यातील फरार संशविताला स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने भडगांव बस स्थानक परिसरातुन अटक.

Spread the love

भडगांव प्रतिनिधी:- भडगाव पोलिस ठाण्यात बलात्काराच्या गुन्ह्यातील फरार संशयिताला स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने भडगाव बस स्थानक परिसरातून
बेड्या ठोकल्या आहेत. विजय दशरथ पाटील (२५,रा.यशवंत नगर, भडगाव) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.

त्याच्याविरुद्ध भडगाव पोलिस स्टेशनला गु.र.न.19/23 भा.द.वि.376 (1), 354 (ड), 506, 507, सह पोस्को
अधिनियम 2012 चे कलम 3 (अ), 4, 11 (1), 12 नुसार गुन्हा दाखल होता. बलात्कारातील संशयित आरोपी विजय पाटील हा गुन्हा घडल्या पासून फरार होता.तो भडगाव शहरातील बस स्थानक परिसरात आला असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे
पो.नि.किसनराव नजन पाटील यांना समजली होती.त्या माहितीच्या आधारे त्याला अटक करण्यात आली आहे पो.हे.कॉ. लक्ष्मण पाटील,पो.ना किशोर राठोड,रणजीत जाधव आदींच्या पथकाने विजय पाटील ला सापळा रचून अटक केली.

हे पण वाचा

टीम झुंजार