झुंजार प्रतिनिधी – संतोष कदम.
वालचंदनगर :- ( ता. इंदापूर ) महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद दरवर्षी इयत्ता 5वी व 8वी वर्गांसाठी स्कॉलरशिप परीक्षा घेत असते. या परीक्षेमध्ये विद्यालयाचे इयत्ता 5वी चे 4 व आठवीच्या 2 विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान पटकावले व एकूण 22 विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र झाले. सदर विद्यार्थी पुणे जिल्हा गुणवत्ता यादीत येऊन विद्यालयाचा नावलौकिक वाढवला आहे. यामुळे शाळा समिती अध्यक्ष मकरंद वाघ यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन केला. तसेच विद्यार्थ्यांना जिल्हा गुणवत्ता यादीत
आणण्यासाठी कोविड महामारीच्या काळात ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने विशेष प्रयत्न करून मार्गदर्शन करणाऱ्या मार्गदर्शक शिक्षकांचा देखील सत्कार याप्रसंगी करण्यात आला. विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षा व क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी होऊन स्वतःची बौद्धिक व शारीरिक क्षमता सिद्ध करून प्राविण्य मिळवत विद्यालयाचा व वालचंदनगरचा नावलौकिक वाढवत राहिला पाहिजे असे आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये मकरंद वाघ साहेब म्हणाले.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माजी शाळा समिती अध्यक्ष अमोल गेंगजे साहेब यांनी शिष्यवृत्ती परीक्षा, एन एम एम एस परीक्षा, मंथन सामान्य ज्ञान परीक्षा व इतर स्पर्धा परीक्षेतील निकाल हा विद्यालयाची गुणवत्ता सिद्ध करणारा आहे असे आपल्या मनोगतुन व्यक्त केले. कार्यक्रमासाठी विद्यालयाचे प्रभारी प्राचार्य चंद्रकांत कांबळे, उपमुख्याध्यापक बाळासाहेब पडारी, उपप्राचार्य अरुण निकम, पर्यवेक्षक काशिनाथ हिरवे, पर्यवेक्षक माणिक पिसे, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व पालक उपस्थित होते.
हे पण वाचा
- एरंडोल बसस्थानकावर सर्वत्र घाणीचे साम्राज्य; आगार व्यवस्थापकांचे बस स्थानकाच्या स्वच्छतेकडे पूर्णपणे दुर्लक्ष.
- पाऊले चालती पंढरीची वाट-चांदसर पायीदिंडीचे एरंडोलला स्वागत स्व. जयवीरबापू पाटील स्मृतीप्रित्यर्थ -गटसचिव संघटना 18 वर्षांपासून करीत आहे अन्नदान.
- “पैसेही गेले आणि बायकोही गेली पुन्हा मी एकटाच”… तीन लाख देऊन आणलेली बायको निघाली एका मुलीची आई; दोन दिवसांत टोळीचा भांडाफोड.
- मेट्रो स्टेशनखाली वडिलांजवळ झोपलेल्या अडीच वर्षांच्या चिमुकल्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधम आरोपीचा एन्काउंटर .VIDEO
- तरुणाचे एकीशी प्रेमसंबंध, तिचं दुसऱ्याशी लग्न ठरलं, तरुण गेला जाब विचारण्यास , तेथे झाला वाद पळून घरी येताना तरूणाचा खून करून तो अपघात असल्याचा केला बनाव.