जळगाव :- सध्या महाराष्ट्रात अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटना काही केल्या कमी होत नाहीये अश्यातच जळगाव शहरातील एका भागात पाणी भरण्याचा बहाण करुन दहा वर्षीय मुलीला घरी बोलावून नंतर तरुणाने दहा वर्षाच्या मुलीसोबत केलं भयंकर कृत्य केल्याचा प्रकार घडला आहे. तिचे कपडे काढून तिच्यासोबत अंगलटपणा करत विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी तरुणाविरोधात रविवारी रात्री सव्वा आठ वाजेच्या सुमारास एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार , एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका भागात अल्पवयीन मुलगी कुटुंबियांसोबत राहते. रविवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास तरुणाने अल्पवयीन मुलीला पाण्याचा बहाणा करुन त्याच्या घरी बोलावले. यानंतर घराचा दरवाजा बंद केला, वाईट उद्देशाने मुलीचे अंगावरील कपडे काढून तिचे अंगावर चादर टाकून तिच्यासोबत अंगलटपणा करत तिचा विनयभंग केला.
घरी परतल्यानंतर मुलीने हा प्रकार तिच्या आई वडीलांना सांगितला. त्यानंतर मुलीच्या वडीलांनी याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरुन विनयभंग करणाऱ्या रोहित युवराज भावसार या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक दिपक जगदाळे हे करीत आहेत.
हे वाचलंत का ?
- एरंडोल बसस्थानकावर सर्वत्र घाणीचे साम्राज्य; आगार व्यवस्थापकांचे बस स्थानकाच्या स्वच्छतेकडे पूर्णपणे दुर्लक्ष.
- पाऊले चालती पंढरीची वाट-चांदसर पायीदिंडीचे एरंडोलला स्वागत स्व. जयवीरबापू पाटील स्मृतीप्रित्यर्थ -गटसचिव संघटना 18 वर्षांपासून करीत आहे अन्नदान.
- “पैसेही गेले आणि बायकोही गेली पुन्हा मी एकटाच”… तीन लाख देऊन आणलेली बायको निघाली एका मुलीची आई; दोन दिवसांत टोळीचा भांडाफोड.
- मेट्रो स्टेशनखाली वडिलांजवळ झोपलेल्या अडीच वर्षांच्या चिमुकल्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधम आरोपीचा एन्काउंटर .VIDEO
- तरुणाचे एकीशी प्रेमसंबंध, तिचं दुसऱ्याशी लग्न ठरलं, तरुण गेला जाब विचारण्यास , तेथे झाला वाद पळून घरी येताना तरूणाचा खून करून तो अपघात असल्याचा केला बनाव.