कळमसरे येथील अल्पवयीन मुलीला पळवून नेत अत्याचार केल्याने गुन्हा दाखल,अमळनेरचा युवकाविरुद्ध पोस्कोसह अँट्रासिटी ,आरोपी अटकेत

Spread the love

अमळनेर / विशेष प्रतिनिधी

येथून जवळच असलेल्या कळमसरे येथील १६ वर्षे १० महिनेच्या अल्पवयीन मुलीला दिनांक ५ रोजी फूस लावून अमळनेर येथील युवकाने पळवून नेत अत्याचार केल्याने मारवड पोलीस ठाण्यात पोस्कोसह अनुसूचित जाती जमाती कायद्यान्वये विविध आठ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला पोलीस अटक केली आहे ,

याबाबत सविस्तर माहिती अशी की , कळमसरे येथील अनुसूचित जमातीच्या कुटुंबातील १६ वर्षे १० महिने वयाच्या अल्पवयीन मुलीला त्यांच्या रखवालीतून दिनांक ५ रोजी फूस लावून पळवून नेल्याने मारवड पोलीस

ठाण्यात मुलीच्या आईने दिलेल्या खबरीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. तीन दिवसांत मारवड पोलिसांनी मुलीला शोधून काढले , तीस जळगाव येथील सुधारगृहात रवानगी केली होती , तेथे पीडित मुलीने दिलेल्या माहितीनुसार एपीआय जयेश खलाने यांनी पोलीस उपविभागीय अधिकारी राकेश जाधव यांनी तपास चक्रे फिरवून पीडित अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेत अत्याचार केल्याने अमळनेर येथील २० वर्षीय युवकाला ताब्यात घेतले.

तपासा अंती आज दिनांक १० रोजी मारवड पोलीस ठाण्यात आरोपी निखिल संतोष चौधरी वय २० राहणार बाहेरपुरा अमळनेर यांच्याविरोधात अल्पवयीन मुलीला कुटुंबीयांच्या रखवलीतून फूस लावून पळवून नेत अत्याचार केल्या प्रकरणी विविध दोन कलमान्वये तर बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्याचे

विविध तीन कलम व अनुसूचित जाती जमाती अधिनियम १९८९ च्या विविध तीन अशा एकूण आठ कलमान्वये गुन्हा दाखल केला असून आरोपीस अटक केली आहे , त्यास सायंकाळी अमळनेर जिल्हा न्यायालयात हजर केले असता ,न्यायालयाने त्याची पोलीस कोठडीत रवानगी केली आहे , पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव हे करीत आहेत.

हे पण वाचा

टीम झुंजार