चाळिसगांव येथे राष्ट्रीय लोक अदालत मध्ये १५९१ प्रकरणे निकाली.

Spread the love

चाळीसगांव :- दि. ११/०२/२०२३ शनिवार रोजी मे. दिवाणी व फौजदारी न्यायालयात मा. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगांव यांच्या आदेशानुसार तालुका विधी सेवा समिती चाळीसगाव व वकिल संघ चाळीसगाव यांचे सयुक्त विद्यामानाने चाळीसगांव न्यायालयात वादपुर्व प्रकरणांच्या कर्ज व न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांच्या वसुली करीता राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते सदरील राष्ट्रीय लोकन्यायालयात अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती तथा दिवाणी न्यायाधीश, व. स्तर चाळीसगांव श्री. एन. के. वाळके, सह दिवाणी न्यायाधीश क.स्तर तथा न्यायदंडाधिकारी वर्ग-१ चाळीसगाव श्री. एस.डी. यादव, दुसरे सह दिवाणी न्यायाधीश, क. स्तर तथा न्यायदंडाधिकारी वर्ग-१ चाळीसगांव

श्रीमती एस.आर.शिंदे, अध्यक्ष वकीलसंघ चाळीसगाव अॅड. पी.एस.सोनवणे, उपाध्यक्ष वकीलसंघ चाळीसगाव अॅड. एच.एल.करंदीकर, सचिव वकीलसंघ चाळीसगांव अॅड. जे.एस.सैय्यद, सहसचिव वकीलसंघ चाळीसगांव, अॅड. बी.आर.पाटील, खजिनदार वकीलसंघ चाळीसगाव श्रीमती एन.एम. लोडाया तसेच पॅनल मेंबर्स अॅड. एल.एच.राठोड, अॅड. रविंद्र लांडगे, अॅड.सौ. माधुरी बी. एडके व न्यायालयीन कर्मचारी, श्री. डी.के. पवार, श्री महेंद्र साळुंखे, श्री. डी. टी. कु-हाडे, श्री. किशोर पाटील यांनी लोकन्यायालयाची कामकाज पुर्ण केले.

सदरील राष्ट्रीय लोकन्यायालयात दाखल पुर्व ७५५३ इतके प्रकरणे ठेवण्यात आली होती त्यापैकी १५९१ इतके प्रकरणे निकाली काढण्यात येवुन त्याबाबतची वसुली रक्कम रु.१०३३५१२१/- इतकी करण्यात आली. त्याच प्रमाणे चाळीसगांव न्यायालयातील एकुण दाखल असलेले दिवाणी व फौजदारी प्रकरणे १२९९ पैकी ९६ इतके निकाली काढण्यात आले त्या बाबतची वसुली रक्कम रु.१४३९७२२०/- इतकी करण्यात आली. अशाप्रकारे एकुण निकाली प्रकरणे १६८७ व एकुण वसुली रक्कम रुपये २४७३२३४१/- करण्यात आली.

तसेच अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती तथा दिवाणी न्यायाधीश, व. स्तर चाळीसगांव श्री. एन. के. वाळके, यांनी म. गटविकास अधिकारी, पंचायत समिती चाळीसगांव, सर्व सहा. अभियोक्ता चाळीसगांव, सर्व बॅंक अधिकारी, नगर पालिका अधिकारी, म.रा.वि.म. अधिकारी, सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी आणि राष्ट्रीय लोक अदालत यशस्वी होणे करीता सहकार्य केलेल्या सर्वांचे आभार व्यक्त केले.

हे पण वाचा

टीम झुंजार