जवखेडे खुर्द येथे तीस वर्षीय युवकाची विष प्राशन करून आत्महत्या.

Spread the love

एरंडोल- जवखेडे खुर्द (ता.एरंडोल) येथील तीस वर्षीय युवकाने राहत्या घरात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना काल सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडली.आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.याबाबत माहिती अशी,की जवखेडे येथील सुदर्शन बळीराम धनगर या युवकाने गुरुवारी सायंकाळी राहत्या घरात विषारी औषध प्राशन केले होते.

सायंकाळी साडेपाच वाजता सुमेरसिंग पाटील यांनी बुधा सुकदेव धनगर यांना मोबाईलवरून तुमच्या साडूच्या मुलाने राहत्या घरात विषारी औषधाचे प्राशन केले असल्याचे सांगितले.बुधा धनगर भूषण रमेश पाटील हे सुदर्शन धनगर याच्या घरी गेले असता घरात कोणीच आढळले नाही तसेच सुदर्शन यास त्रास होत असल्यामुळे त्यास एरंडोल येथे कल्पना हॉस्पिटल येथे दाखल केले.

उपचार सुरु असतांना तो मयत झाला.याबाबत बुधा धनगर यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विकास देशमुख तपास करीत आहेत.मयत सुदर्शन शेतात मजुरीचे काम करून परिवाराचा चरितार्थ चालवत होता.त्याच्या पच्छात आई,पत्नी व सात आणि तीन वर्ष वयाची दोन मुले आहेत.आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

हे पण वाचा

टीम झुंजार