भुसावळ :- बौद्ध साहित्य परिषद जळगाव मार्फत, एप्रिल महिन्यात साहित्य संमेलन घेण्यात येणार आहे. त्यानिमित्त भुसावळ येथे बैठक घेण्यात आली. त्यातच संमेलनाबाबत स्वरूप व संपूर्ण नियोजन, बौद्ध साहित्य परिषदेचे सचिव व साहित्य संमेलनाचे नियोजित स्वागताध्यक्ष आयु.भरत शिरसाट यांनी सविस्तरपणे आपले मत व्यक्त केले.
भुसावळ शहर समन्वय समिती व तालुका समन्वय समिती स्थापन करण्यात आली. शहर समितीचे अध्यक्ष आयु महेंद्र मेढे व आनंद सपकाळे ग्रामीण समितीचे अध्यक्ष आयु प्रमोद खैरे व कमलेश श्यामकुवर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. संमेलन यशस्वी करण्यासाठी तन-मन-धनाने सर्वांनी एकोपा दाखविला. या दरम्यान जळगाव पतपेढी मध्ये निवडून आलेले नवनिर्वाचित संचालक आयु जे पी सपकाळे सर यांचा सत्कार करण्यात आला. बैठकीत प्रा.डॉ. जतीन मेढे, संजू भटकर, एस एस अहिरे, आर आर धनगर, बी टी सपकाळे, आर एस अडकमोल, राजेंद्र सुरवाडे, दिलीप प्रधान, जे जी जाधव, अशोक सोनवणे, ए आर बागुल, आर पी तायडे, नागेश्वर साळवे, विवेक नरवाडे महेंद्र तायडे, समाधान जाधव, अतुल तायडे, सुमेध साळवे, स्वप्निल धोटे, प्रशिक नरवाडे, सौ भारती अवचारे, आधी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन भालेराव सर यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन व आभार पी बी नरवाडे सर यांनी केले होते.
हे वाचलंत का ?
- ViralVideo:पतीने आपल्या पत्नीला परपुरुषासोबत भररस्त्यात रंगेहात पकडले, पतीला आला संताप, पुढे काय झालं पहा व्हिडिओ.
- मुख्याध्यापिकेला रग्गड पगार तरीपण पैशांचा मोह आवरेना; प्रसूती रजा मंजुरीसाठी 36 हजार रुपयांची लाच घेताना ACB ने रंगेहात पकडले.
- अमळनेर तालुक्यात ३२ वर्षीय इसमाने गळफास घेऊन संपविली जीवनयात्रा.
- पंचायत समिती कडुन नागरीकांना होणाऱ्या गैरसोयी तातडीने थांबवा – आमदार मा.अमोलदादा पाटील
- जळगाव शहरातील उच्चस्तरीय हॉटेलमध्ये पोलिसांचा छापा,8 जुगारींना अटक, 20 लाख रुपयांच्या रोकडसह मुद्देमाल जप्त.