एरंडोल तालुक्यातील तीन प्राथमिक आरोग्य केंद्रात महाआरोग्य शिबिराचे आयोजन

Spread the love

प्रतिनिधी | एरंडोल
एरंडोल:- मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबिर एरंडोल तालुक्यातील तळई, कासोदा, रिंगणगाव या प्राथमिक आरोग्य केंद्रात महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले. तिन्ही प्राथमिक आरोग्य केंद्रात अनेक नागरिक व महिलांनी आरोग्य तपासणी करून सहभाग नोदविला. शिबिराचे उद्घाटन वासुदेव पाटील जिल्हा प्रमुख बाळासाहेबांची शिवसेना यांचे हस्ते करण्यात आले .

यावेळी डॉ.महेश पवार, डॉ.अर्चना राजपूत स्त्रीरोग तज्ज्ञ व डॉ.राहूल पाटील बालरोग तज्ञ यांचे कडून तपासणी करण्यात आली. डॉ.दिपक पाटील, डॉ.सागर पाटील वैद्यकीय अधिकारी तळई , तालुका आरोग्य सहाय्यक, सेवक श्री महाजन नाना आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेवक.सेविका हजर राहून शिबिर उत्साहात पार पडले.
प्राथमिक आरोग्य केंद्र कासोदा येथे महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन करण्यात आले उद्घाटन

या प्रसंगी बापूसो महेश पांडे सरपंच कासोदा तसेच बाळासाहेबांची शिवसेना जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील तालुकाप्रमुख रवी जाधव शहर संघटक मयूर महाजन माजी सरपंच सुदाम राक्षे ग्रामपंचायत सदस्य भाऊसो नरेश भाऊ ठाकरे प्रशांत पारधी व इतर नागरिक व तालुका आरोग्य सहाय्यक कैलास पाटील व आरोग्य सेवक केशव ठाकूर तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र येथील कर्मचारी रुंद उपस्थित होते.

हे पण वाचा

टीम झुंजार