मांडळ येथे पुन्हा रात्रीवाळू माफियांचा धुमाकूळ सुरू, ग्रामस्थांनी पकडुन दिले वाळूचे ट्रॅक्टर, चालक मालक फरार.

Spread the love

पोलिसांत तीन जणांविरुद्ध रात्रीच गुन्हा दाखल

अमळनेर / विशेष प्रतिनिधी

येथून जवळच असलेल्या मांडळ येथे पांझरा नदीपात्रातुन अवैद्य वाळू चोरी प्रकरणातून वाळू चोरणाऱ्या टोळीने एकाचा खून केल्याबाबत सहा जनांना पोलिसांनी अटक केली होती , त्यानंतर काही दिवस उलटताच पुन्हा वाळू माफियांचा मांडळ नदीपात्रात धुमाकूळ सुरू झाला असून आता ग्रामस्थांनी कठोर भूमिका घेत वाळू चोरणाऱ्यावर पाळत ठेवून दिनांक ११ रोजी वाळू चोरून नेताना ट्रॅक्टर ट्रालीसह महसूलच्या पकडुन दिले आहे. ते वाहन मुद्देमालसह पोलीस ठाण्यात जमा करून याबाबत मांडळचे तलाठी यांनी फिर्याद दिल्यावरून ट्रॅक्टर चालक मालक व साथीदार अशा तीन जनांवर मारवड पोलीस ठाण्यात गौण खनिज अवैद्य चोरीबाबत गुन्हा दाखल झाला आहे

रात्रीच्या अंधारात फायदा घेऊन मांडळ परिसरात पांझरा नदीपात्रात विना परवानगी अवैद्य वाळू उपसा करून वाहतूक सुरू झाल्याची चाहूल गावातील तरुणांना लागली त्यांनी पाळत ठेवून दिनांक ११ च्यारात्री १ वाजता वाळूने भरलेले सोनालीला ट्रक्टर शेतरस्त्याने जाताना पकडून ठेवले व तहसीलदार मिलिंद वाघ यांना कळविले , तहसीलदारांनी लागलीच महसूल विभागाच्या रात्रीच्या फिरत्या पथकाला व मारवड पोलीस ठाण्याचे पीएसआय विनोद पाटील ,हवालदार सुनील तेली , फिरोज बागवान यांना घटनास्थळी पाठवून कारवाईचे आदेश दिले , याप्रकरणी तलाठी राजेंद्र दाभाडे यांच्या फिर्यादीवरून मारवड पोलीसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

फिर्यादीत नमूद केले आहे की, ११ फेब्रुवारी रोजी रात्री तहसिलदारांनी दाभाडे यांना फोनद्वारे कळविले कि, ट्रॅक्टर पकडल्याची माहिती दिल्याने त्याठिकाणी भेट दिली असता एक निळ्या रंगाचे सोनालीका कंपनीचे विना क्रमांकाचे एक ब्रास वाळु भरलेल्या स्थितीत आढळुन आले.मात्र वाहन चालक मालक व साथीदार यांनी अंधाराचा फायदा घेऊन पळ काढला , तेथे उपस्थित असलेले सरपंच विजय नथ्थु पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष राजेंद्र धनगर, वाळुबंदी अध्यक्ष सुरेश लोटन कोळी यांना विचारपुस केली असता त्यांनी सांगितले कि, सदर ट्रॅक्टर चालक हा ज्ञानेश्वर प्रकाश कोळी (रा मांडळ) व मालक योगेश हिलाल कोळी व गोकुळ बापु शिरसाठ (दोन्ही रा मांडळ) असे असून यांनी शासनाची कुठलीही परवानगी न घेता पांझरा नदी पात्रातुन बेकायदेशीर वाळू वाहतुक करताना मिळुन आल्याने ग्रामस्थांनी व महसूल पथकाने मारवड पोलीस ठाण्यात आणून २ लाख ५४ हजारांचा पंचनामा करून एक ब्रास वाळूसह ट्रॅक्टर ट्रालीसह मुद्देमालसह जमा केले.

यावेळी चालक व मालक फरार झाले. सदर ठिकाणी पंचनामा करून अडीच लक्ष रुपये किंमतीचे निळया रंगाचे सोनालीका कंपनीचे ट्रॅक्टर लाल रंगाची ट्रॉली व साडे चार हजार रुपये किंमतीची एक ब्रास वाळू असा मुद्देमाल मारवड पोलीसात जमा करण्यात आला असून तलाठी राजेंद्र दाभाडे यांनी वरील तिन्ही आरोपींविरुद्ध फिर्याद दिल्याने विना परवानगी अवैद्य वाळू उपसा करून वाहतूक बाबत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस नाईक भरत गायकवाड हे करीत आहेत.

हे पण वाचा

टीम झुंजार